ETV Bharat / entertainment

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिया मिर्झानं पती वैभव रेखीबरोबरचे फोटो केले शेअर - लग्नाचा वाढदिवस

Dia Mirza Vaibhav Anniversary: अभिनेत्री दिया मिर्झा 15 फेब्रुवारी तिच्या दुसऱ्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी तिनं सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Dia Mirza Vaibhav Anniversary
दिया मिर्झाच्या लग्नाचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 4:21 PM IST

मुंबई - Dia Mirza Vaibhav Anniversary: अभिनेत्री दिया मिर्झा हिच्यासाठी आज 15 फेब्रुवारी हा दिवस खूप खास आहे. आज दिया तिच्या दुसऱ्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहे. दियानं 2021 मध्ये वैभव रेखीशी लग्न केले. याआधी तिनं 2014 मध्ये साहिल संघाबरोबर लग्न केले आणि 2019 मध्ये पाच वर्षांनी त्यांच नात तुटलं. पहिल्या लग्नाच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी दियानं दुसरे लग्न केलं. आज, 15 फेब्रुवारी रोजी, दियानं पती वैभवला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे तिच्या चाहत्यांनी आजवर न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

दियाची भावनिक पोस्ट : तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिनं एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, ''या दिवशी आम्ही खूप रडलो, आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू, आम्ही आमच्या सुखात आणि दु:खामध्ये एकमेकांबरोबर होतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी'' दियाच्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देऊन तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय बिपाशा बसू, फरदीन खान आणि संध्या मृदुल यांनी तिला तिच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिया मिर्झाला या लग्नापासून दोन मुले आहेत, ज्यांच्याबरोबर दिया अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. याशिवाय ती आपल्या चाहत्यासोबत अनेकदा इंस्टा लाईव्ह करून संवाद साधत असते. दियाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, तिचे इंस्टाग्रामवर 5.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

दिया मिर्झाच वर्कफ्रंट : दियाच्या फिल्म वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, 2023 मध्ये ती 'मेड इन हेवन' या वेब सीरीज आणि 'भीड'मध्ये दिसली होती. याशिवाय ती 'धक धक'मध्ये ती संजना सांघी, रत्ना पाठक, फातिमा सना शेख, कल्लिरोई ट्झियाफेटा, निशांक वर्मा, धीरू द्विवेदी, माही जैन आणि इतर कलाकरांबरोबर दिसली होती. तिचा हा चित्रपट अनेकांना आवडला होता.

हेही वाचा :

  1. अजय देवगण आणि ज्योतिका स्टारर 'शैतान'मधील 'खुशियां बटोर लो' गाणं रिलीज ; पाहा व्हिडिओ
  2. सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा'चं स्काई डाइविंगसह पोस्टर रिलीज
  3. शाहरुख खानला बनायचं आहे 'जेम्स बाँडचा व्हिलन', हॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलला किंग खान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.