ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट आली समोर, कधी होणार आई जाणून घ्या... - RANVEER SINGH and Deepika Padukone - RANVEER SINGH AND DEEPIKA PADUKONE

Deepika Padukone : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लवकरच आई-वडील होणार आहेत. सप्टेंबरमध्ये हे जोडपे त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. दरम्यान, दीपिकाची डिलिव्हरी डेट समोर आली आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण (Deepika Padukone and Ranveer Singh (ANI photo))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 12:11 PM IST

मुंबई -Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या प्रेग्नन्सीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. लवकरच ती आणि तिचा पती रणवीर सिंग त्याच्या पहिल्या मुलाचं स्वागत करणार आहे. या जोडप्यानं फेब्रुवारी 2024 मध्ये जाहीर केलं होतं की ते यावर्षी सप्टेंबरमध्ये पालक होणार आहे. दरम्यान दीपिका ही सप्टेंबरमध्ये कोणत्या दिवशी मुलाला जन्म देईल, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सेलिब्रिटी पापाराझी विरल भयानीनं अलीकडेच दीपिका पदुकोणच्या डिलिव्हरीच्या तारखेबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती 28 सप्टेंबर रोजी आई होऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे.

दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट : दरम्यान रणवीर-दीपिकाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता सोशल मीडियावर दीपिकाच्या डिलिव्हरीच्या तारखेबद्दल चर्चा होत आहे. या तारखेचा संबंध अभिनेता रणबीर कपूरबरोबर असल्याचं काही चाहते, या पोस्टवर म्हणताना दिसत आहेत. या दिवशी रणबीरचादेखील वाढदिवस आहे. जेव्हापासून दीपिकाची डिलिव्हरीच्या तारीख समोर आली, तेव्हापासून सोशल मीडिया यूजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दुसरीकडे, दीपिका कामापासून दूर आहे. ती आई होण्याचा खूप आनंद घेत आहे. अनेकदा ती आपल्या कुटुंबाबरोबर लंच आणि डिनरसाठी जाताना दिसते.

दीपिका पदुकोण झाली होती ट्रोल : दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मुलाच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. तसेच आता देखील काहीजण दीपिकाच्या प्रेग्नेन्सीला फेक असल्याचं म्हणत आहे. तसेच तिला याबाबत अनेकांनी ट्रोल केलं होतं. यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया यूजर्सनं तिला पाठिंबा दिला होता. ट्रोलर्सला शांत केलं होतं. दरम्यान दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटामध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यामध्ये तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत अभिनेता अमिताभ बच्चन आणि प्रभास दिसले होते. याशिवाय पुढं ती रोहित शेट्टीच्या' सिंघम अगेन' चित्रपटामध्ये अजय देवगण आणि करीना कपूर खानबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोणचं नातेवाईकांबरोबर डिनर गेट टूगेदर, बॅटमिंटनपट्टू लक्ष्य सेनबरोबर झाली स्पॉट - Deepika Padukone
  2. ऑलिम्पिक जिंकणाऱ्या मनू भाकरसह सरबज्योत सिंगचे सेलिब्रिटींकडून अभिनंदन, वाचा कोण काय म्हणाले? - Paris Olympics 2024
  3. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोणचा लूक पाहून चाहते झाले घायाळ - SANGEET CEREMONY

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.