मुंबई - Animal On OTT : रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'अॅनिमल'नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटानं जगभरात 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा चित्रपटगृहात झळकला होता. 'अॅनिमल' पाहण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटच्या तिकिटामध्ये कपात केला होता. 'अॅनिमल'ची तिकिटं 100 रुपये करण्यात आली होती. दरम्यान 'अॅनिमल' आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट निश्चित झाली आहे.
-
The air is dense and the temperature is rising. 🔥🔥
— Netflix India (@NetflixIndia) January 25, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Witness his wild rage in Animal, streaming from 26 January on Netflix in Hindi, Tamil, Telugu, Malayalam and Kannada. #AnimalOnNetflix pic.twitter.com/ituQvrT9kS
">The air is dense and the temperature is rising. 🔥🔥
— Netflix India (@NetflixIndia) January 25, 2024
Witness his wild rage in Animal, streaming from 26 January on Netflix in Hindi, Tamil, Telugu, Malayalam and Kannada. #AnimalOnNetflix pic.twitter.com/ituQvrT9kSThe air is dense and the temperature is rising. 🔥🔥
— Netflix India (@NetflixIndia) January 25, 2024
Witness his wild rage in Animal, streaming from 26 January on Netflix in Hindi, Tamil, Telugu, Malayalam and Kannada. #AnimalOnNetflix pic.twitter.com/ituQvrT9kS
ओटीटीवर 'अॅनिमल' प्रदर्शित होईल : आज 25 जानेवारी रोजी नेटफ्लिक्स इंडियानं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि एक्स हँडलवर 'अॅनिमल'ची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'अॅनिमल'साठी तयार राहा, हा चित्रपट 26 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. 'अॅनिमल' चित्रपट हिंदी तसंच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.'' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. 'अॅनिमल' चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
'अॅनिमल' चित्रपटाची कमाई? : 'अॅनिमल'नं पहिल्या दिवशी 66 कोटी आणि जगभरात 116 कोटी रुपयांची कमाई केली होती. 2023 मध्ये, शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'पठाण' या चित्रपटांनंतर 'अॅनिमल' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'अॅनिमल' या चित्रपटाद्वारे रणबीरनं त्याचा पहिल्या 500 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या 'संजू' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. संजूनं जगभरात 586 कोटींची कमाई केली होती. आता अनेक चाहते 'अॅनिमल' ओटीटी रिलीजची वाट पाहात आहेत. 'अॅनिमल' चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलंय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. दरम्यान रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'रामायणा पार्ट 1',लव्ह अॅन्ड वॉर', 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' आणि 'ब्रह्मास्त्र पार्ट 3'मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :