ETV Bharat / entertainment

'चंदू चॅम्पियन'च्या स्क्रिनिंगमध्ये रिअल हिरो मुरलीकांत पेटकर आणि कार्तिक आर्यन झाले भावूक - kartik aaryan - KARTIK AARYAN

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. काल या चित्रपटाचं मुंबईत स्क्रिनिंग झालं. यावेळी त्याच्याबरोबर पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर होते, हा चित्रपट पाहून ते भावूक झाले.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 5:29 PM IST

मुंबई - Kartik Aaryan : सध्या कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट 14 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कहाणी पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये कार्तिकनं मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी कार्तिकनं खूप मेहनत घेतली असून त्याच्यामधील हे ट्रांसफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. दरम्यान, मुंबईतमध्ये हा चित्रपट कार्तिक आर्यननं खरा हिरो आणि भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्याबरोबर पाहिला.

'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचं स्क्रिनिंग : 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट पाहिल्यानंतर मुरलीकांत पेटकर यांचा मुलगा भावूक होऊन त्यानं कार्तिक आणि चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांना मिठी मारली. यानंतर कार्तिक मुरलीकांत यांच्याकडे गेला आणि तो देखील भावूक झाला. कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन'च्या स्क्रिनिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुरलीकांत पेटकर बरोबर कार्तिक दिसत आहे. या स्क्रिनिंगला भारतीय भूदलामधील अधिकारीही आल्याचं दिसलं. 'चंदू चॅम्पियन'च्या पहिल्या स्क्रीनिंगचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत कार्तिकनं यावर लिहिलं, "चंदू चॅम्पियन'चे पहिले स्क्रिनिंग रिअल हिरो मुरलीकांत पेटकर सरांबरोबर, अनेक त्रासानंतरही आत्मसमर्पण करण्यास नकार देणारा माणूस, चित्रपटाचं प्रदर्शित होण्यासाठी दोन दिवस बाकी आहे."

'चंदू चॅम्पियन' चित्रपटाबद्दल : 'चंदू चॅम्पियन'चं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं असून साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक व्यतिरिक्त श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, पलक लालवानी, भुवन अरोरा, राजपाल यादव, विजय राज, मनोज आनंद आणि इतर स्टार्स दिसणार आहेत. याआधी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामधील ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर चाहत्यांना खूप पसंत पडला. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'आशिकी 3'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'भूल भुलैया 3'मध्ये विद्या बालनबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर रिलीज होईल.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो रिलीज, रॅपर बादशाह करणार 'सनसनाटी' खुलासा - The great indian kapil show
  2. आलिया भट्टनंतर 'लाफ्टर क्वीन' भारती सिंगनं लावला कानामागे काळा टिळा - BHARATI SINGH
  3. आमिरचा मुलगा जुनैद खानच्या चित्रपटाला हिंदू संघटनांचा विरोध, ट्रेलर-प्रमोशनशिवाय 'महाराज' होणार थेट रिलीज - Maharaj release

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.