ETV Bharat / entertainment

बोनी कपूरनं 'नो एंट्री'च्या सीक्वलची केली घोषणा ; 'मिस्टर इंडिया'बद्दल केला खुलासा - Boney Kapoor - BONEY KAPOOR

Mr India 2 and No Entry 2 : बोनी कपूरनं 'मिस्टर इंडिया' चित्रपटाचा सीक्वल बनविण्याबद्दल खुलासा केला आहे. याशिवाय त्यांनी 'नो एंट्री' सीक्वलच्या स्टार कास्टबद्दल अनिल कपूर नाराज असल्याचं सांगितलं आहे.

Mr. India 2 and No Entry 2
मिस्टर इंडिया आणि नो एंट्री
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 5:56 PM IST

मुंबई Mr India 2 and No Entry 2 : निर्माता बोनी कपूर सध्या आपल्या अनेक प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहेत. नुकतीच बातमी आली होती की, बोनी कपूर लवकरच 'नो एंट्री'चा सीक्वेल आणणार आहेत. दरम्यान, आणखी एका सीक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. अलीकडेच बोनी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील 'मिस्टर इंडिया' या क्लासिक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. बोनी कपूर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं की,''आम्हाला 'मिस्टर इंडिया'च्या सीक्वेलसाठी अनेक ऑफर्स मिळत आहेत. एका हॉलिवूड स्टुडिओनं आम्हाला एक मोठी ऑफर दिली आहे. तुम्हा सर्वांना एक-दोन वर्षांत या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल ऐकायला मिळेल.''

अनिल कपूर चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल नाराज : पुढे त्यांनी सांगितलं, ''माझ्या क्रू सदस्यांना वाटते की 'मिस्टर इंडिया' चित्रपट बनू नये कारण आता श्रीदेवी, अमरीश पुरी आणि सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. पण या चित्रपटाबाबत मी आणखी काही योजना आखल्या आहेत.'' नो एंट्री'बद्दल बोलायचं झालं तर वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ या सीक्वेलमध्ये धमाल करताना दिसणार आहेत. मात्र अनिल कपूर चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल नाराज आहेत. बोनी कपूरनं याबद्दल सांगितलं होतं की, ''अनिल कपूरला या चित्रपटाचा भाग व्हायचे होतं पण त्याच्यासाठी या चित्रपटामध्ये रोल नव्हता. तो आता माझ्याशी नीट बोलत नाही, पण मला आशा आहे की लवकरच सर्व काही ठीक होईल.''

'नो एंट्री' शूटिंग कधी सुरू होईल? : 'नो एंट्री' चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे शूटिंग या वर्षी डिसेंबरच्या शेवटी सुरू होईल. हा चित्रपट 2025 मध्ये चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. मात्र, निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या नायिकेचं नाव उघड केलेले नाही. 2005 मध्ये रिलीज झालेला 'नो एन्ट्री' सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमान खान, फरदीन खान, अनिल कपूर, बिपाशा बसू, सेलिना जेटली, ईशा देओल, बोमन इराणी आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

हेही वाचा :

  1. जॅकलीन फर्नांडिसनं एक फोटो शेअर करुन चाहत्यांना इस्टरच्या दिल्या शुभेच्छा - Jacquelien Fernandez
  2. रणदीप हुड्डानं अमेरिकेच्या 'ओपेनहाइमर' चित्रपटावर केली टीका - Randeep Hooda
  3. करण जोहरच्या 'द बुल' चित्रपटाची शूटिंग डेट न ठरल्यानं सलमान खाननं घेतला मोठा निर्णय - salman khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.