मुंबई - Vikrant Massey and Raghu Ram : बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसी हा आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. टीव्हीवर साईड रोल्स करणारा विक्रांत ओटीटी आणि नंतर बॉलिवूडकडे वळला, यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला. आज त्यानं स्वत:च्या मेहनतीनं बॉलिवूडमध्ये नाव कमवलं आहे. अलीकडेच, विक्रांत 'ट्वेल्थ फेल'मध्ये त्याच्या धमाकेदार कामगिरीमुळे चर्चेत आला होता. आता विक्रांत मॅसीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये तो 'रोडीज'चा माजी होस्ट रघु रामबरोबर भांडताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आता त्यांच्या भांडणाचं कारण काय आहे हे जाणून घेऊया.
विक्रांत मॅसी रघु रामवर संतापला : व्हिडिओत विक्रांत मॅसी सेटवर दिसत आहे. त्याच्याबरोबर रघु रामही आहे. दोघेही शूटिंगच्या तयारीत आहे. व्हिडिओमध्ये विक्रांत मॅसी म्हणतो, "यार अर्जुन, जर तो असाच फालतू बोलत राहिला तर मी निघतो." हे ऐकून रघु आणखीनच चिडतो आणि म्हणतोस "प्रत्येक वेळी हे तुला चालणार नाही, इथून निघून जा.' मला जे म्हणायचे आहे ते मी बोलेन. चल, घरी जा." उत्तरात विक्रांत म्हणतो- "आज तू इथे आहे, माझ्यामुळे आहे." यानंतर रघुराम रागावतो, अन्न जमिनीवर फेकून आणि शिवीगाळ करत निघून जातो. रघुचं असं वागणं पाहून विक्रांत म्हणतो, " हाअसा आहे वेडा माणूस."
पापाराझीनं शेअर केला व्हिडिओ : विक्रांत आणि रघुच्या भांडणाचा हा व्हिडिओ पापाराझीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. आता या दोघांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हणत आहेत. याशिवाय काहीजण भांडण खरच झालं, असल्याचं म्हणत आहेत. कमेंट करताना एका यूजरनं यावर लिहिलं, "रघु राम खूप वाईट अभिनय करत आहे." आणखी दुसऱ्यानं लिहिलं, "चर्चेत राहण्यासाठी काही पण करतात." अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. दरम्यान विक्रांत मॅसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'फिर आयी हसीन दिलरुबा' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटात त्याच्याबरोबर तापसी पन्नू आणि सनी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जिमी शेरगिल, आदित्य श्रीवास्तव यांसारखे कलाकारही चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकेल.
हेही वाचा :