मुंबई - Govinda Latest News : बॉलिवूड अभिनेता गोविंदा लायसन्स रिव्हॉल्व्हर साफ करत असताना चुकून त्याच्या पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळी लागल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या गोविंदाची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे. गोविंदाकडं परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे 4.45 वाजता सुमारास घडली आहे. गोविंदा सकाळी कुठेतरी जाण्यासाठी निघाला असताना, हा अपघात झाला. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आता या प्रकरणी गोविंदाची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
- गोविंदाची प्रतिक्रिया : यात त्यानं म्हटलं,"नमस्कार, मी गोविंदा... तुमचा आणि आई-वडिलांचा आशीर्वाद तसेच गुरुची कृपा आहे. त्यामुळे लागलेली गोळी काढण्यात आली. मी डॉक्टरांचे आणि अग्रवाल डॉक्टरांचे आभार मानतो. तुमच्या सर्वांची प्रार्थना माझ्यासोबत आहे. धन्यवाद"
गोविंदाला लागली गोळी : गोविंदाच्या गुडघ्याजवळ गोळी लागली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या गोविंदाच्या कुटुंबाचे अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. दरम्यान मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, "अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा यांच्या पायाला आज सकाळी चुकून त्याच्याच रिव्हॉल्वरनं गोळी लागल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे." आता ही गंभीर घटना समोर आल्यानंतर गोविंदाच्या चाहत्यांना एक धक्का बसला आहे. अनेक चाहते आता गोविंदाच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहे. दरम्यान गोविंदाच्या गुडघ्यावर गोळी लागल्यानंतर त्याच्या डान्सवर नक्कीच या गोष्टीचा परिणाम होईल, असे सध्या त्याचे काही चाहते म्हणताना दिसत आहेत.
Actor and Shiv Sena leader Govinda has been taken to the nearest hospital after he was accidentally shot in the leg by his own revolver this morning, says a senior Mumbai Police official
— ANI (@ANI) October 1, 2024
More details awaited.
(file pic) pic.twitter.com/SBqnMcDgoA
गोविंदाची कारकीर्द : गोविंदा 80च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. काही वर्षांपासून गोविंदा चित्रपट जगतापासून दूर राजकारणात सक्रिय आहे. गोविंदानं त्याच्या चित्रपट कारकिर्दीत एकामागून एक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये 'हिरो नंबर 1', 'राजा बाबू', 'आंटी नंबर 1', 'आँखे', 'कुली नंबर 1' यासह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. गोविंदा एक अभिनेता आणि राजकारणीदेखील आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोविंदानं शिवसेना शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला.
हेही वाचा-गोविंदाच्या पायाला कशी लागली गोळी? रुग्णालयात उपचार सुरू - Govinda misfire news