ETV Bharat / entertainment

रितेश देशमुखनं दिला घरातील सदस्यांना धक्का, अक्षय कुमार होणार 'बिग बॉस मराठी'मध्ये दाखल - Bollywood actor Akshay Kumar - BOLLYWOOD ACTOR AKSHAY KUMAR

Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखनं शनिवारच्या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान आज 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर अक्षय कुमार 'खेल खेल में' चित्रपटाच्या टीमबरोबर दाखल होणार आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 1:39 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा 5वा सीझन खूप चर्चेत आहेत. या शोचा आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. रोज बिग बॉसच्या घरात नवीन गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी 5'चा दुसरा भाऊचा धक्का (वीकेंड का वार) नुकताच पार पडला. यावेळी रितेश देशमुखनं जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी,अरबाज आणि वैभव या सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. रितेशनं जान्हवीला संपूर्ण घरावर दादागिरी करून अपशब्द वापरल्याबद्दल खडेबोल सुनावले. तसेच रितेशनं यावेळी काही सदस्यांचं कौतुक देखील केलं आहे. या शोमध्ये रितेशन सूरज चव्हाणला चांगला खेळून पुढं जाण्याचा सल्ला दिला.

रितेश देशमुखनं घेतली शाळा : शनिवारच्या भागात रितेशनं अरबाज, वैभव, जान्हवी, निक्की आणि घन:श्यामला त्यांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल कानउघडणी केल्यानंतर आता सोशल मीडियावर अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. यानंतर दुसऱ्या ग्रुपच्या सदस्यांना गार्डन परिसरात पिकनिक बंद करा आणि खेळायला लागा असा सल्ला रितेशनं दिला आहे. यावेळी रितेशन योगिता चव्हाणचं कौतुक केलं, यावर तिच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी तिनं आपल्या मनातली एक गोष्ट रितेशला सांगत तिनं संपूर्ण टीमची माफी मागितली. यानंतर ती म्हणते, "मला सगळे म्हणतात की, तू इथे कशाला आलीस, माझ्या चुका देखील मी मान्य करते. यानंतर रितेश सांगतो की, इथे कोण राहणार हे सर्व बिग बॉस ठरवतात."

बिग बॉसच्या घरात 'खेल खेल में' चित्रपटाची टीम : 'बिग बॉस मराठी' भाऊच्या धक्क्यावर आज बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार येणार आहे. यावेळी तो आपल्या 'खेल खेल में' चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबर शोमध्ये हजेरी लावणार आहे. यामध्ये तापसी पन्नू, वाणी कपूर, फरदीन खान आणि इतर कलाकार दिसणार आहे. आता यावेळी बिग बॉसच्या घरात चांगलाच कल्ला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात सध्या दोन ग्रुप पडले आहे, यात निक्कीचा ग्रुपमध्ये जान्हवी, अरबाज, वैभव आणि घनश्याम हे आहेत. तसेच दुसऱ्या ग्रुपमध्ये आर्या, अभिजीत, अंकिता, सूरज, धनंजय आणि पंढरीनाथ हे सदस्य आहेत.

हेही वाचा :

  1. वर्षा उसगांवकर यांचा अनादर केल्याबद्दल जान्हवी किल्लेकरला केलं यूजर्सनं ट्रोल - Jahnavi disrespecting Varsha
  2. बिग बॉस मराठी सीझन 5च्या दुसऱ्या आठवड्यात कोण झालं नॉमीनेट, घ्या जाणून - BIGG BOSS MARATHI
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान सूरज चव्हाण आणि वैभव चौहानमध्ये झालं भांडण, व्हिडिओ व्हायरल - BIGG BOSS MARATHI

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.