ETV Bharat / entertainment

'बिग बॉस सीझन 17' चा विजेता ठरला मुनव्वर फारुकी! काय मिळालं बक्षीस? - रिॲलिटी शो बिग बॉस सीझन 17

Munawar Farooqui won Bigg Boss Season 17 : रिॲलिटी शो 'बिग बॉस सीझन 17' चं विजेतेपद मुनव्वर फारुकीने पटकावलं आहे. रविवारी मुनव्वरचा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्याला हे विजेतेपद मिळालं. यावेळी त्याला विजयी ट्रॉफी, एक कार आणि रोख 50 लाख रुपये रक्कम विजेता म्हणून देण्यात आली.

Munawar Farooqui won 'Bigg Boss Season 17
'बिग बॉस सीझन 17' चा विजेता ठरला मुनव्वर फारुकी
author img

By ANI

Published : Jan 29, 2024, 6:40 AM IST

Updated : Jan 29, 2024, 7:14 AM IST

'बिग बॉस सीझन 17' चा विजेता ठरला मुनव्वर फारुकी

मुंबई : Munawar Farooqui won Bigg Boss Season 17 : रिॲलिटी शो 'बिग बॉस शोचे विजेतेपध अखेर मुनव्वर फारुकीने मिळवलं. गेली 105 दिवस चाललेल्या या अटीतटीच्या लढाईत कोण बाजी मारणार याची सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर याचा निकाल लागला. मुनव्वर फारुकीच्या नावाची घोषणा झाली. त्याला चाहत्यांकडून सर्वाधिक मत मिळाल्यानं त्याची विजेता म्हणून घोषणा झाली. तर अभिषेक कुमारला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानाव लागलं. तर अभिनेत्री अंकिता लोखंडेला विजेतेपद मिळालं नसल्यानं अनेक चाहत्यांची निराशा झाली.

  • #WATCH | Mumbai: On winning the 17th season of 'Bigg Boss', stand-up comedian Munawar Faruqui says, "...I am very happy and thankful. I am fortunate to have such a fan following...I always remember my parents during the sad and happy times..." pic.twitter.com/oMYpMA5qvq

    — ANI (@ANI) January 28, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वाढदिवसालाच विजय संपादन : बिग बॉस सीझन 17 या सलमान खानच्या या शोचा प्रवास 17 स्पर्धकांपासून सुरू झाला. दरम्यान, काही स्टार्स वाइल्ड कार्डच्या रुपात शोचा भाग बनले. सर्वांना मागे टाकत मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सुरुवातीपासून फारुकीनं शेरोशायरी करत बिग बोसमध्ये वेगळीच छाप पाडली होती. इतर स्पर्धकांच्या तुलनेत पारड जड असल्यानं फारुकीचं विजेता होईल, अशी अनेकांना खात्री होती. मात्र, अखेरच्या क्षणी चाहत्यांच्या मतावरून बिग बॉसचा विजेता ठरणार असल्यानं शेवटच्या क्षणापर्यंत विजेता कोण होणार, याची चाहत्यांना उत्सकुता होती.

मी बिग बॉसचा विजेता ठरल्यानं खूप आनंदी आहे. खूप चाहतावर्ग मिळाल्यानं मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांचा आभारी आहे. दुःख असो की आनंदाचा काळ मला अशावेळी आई-वडिलांची नेहमीच आठवण येते-स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी

ग्रँड फिनालेचा भाग : बिग बॉसचा हा सीझन 15 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झाला. 107 व्या दिवशी या ''शो'ला विजेतेपद मिळालं आहे. 28 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ग्रँड फिनालेचा भाग सुरू झाला. त्यानंतर शोमधून बाहेर पडलेले अनेक स्पर्धक परफॉर्म करताना दिसले. टॉप 5 अंतिम स्पर्धकांपैकी एकेक करून उर्वरित चार स्पर्धक बाहेर पडले. त्यामध्ये अंकिता लोखंडेंचा समावेश असल्याचं पाहून खुद्द शोचा होस्ट असलेल्या सलमान खानलादेखील धक्का बसला.

हे अगोदर बाहेर पडले : हैदराबादचा गेमर अरुण महाशेट्टी हा शोमधून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक होता. त्यानंतर अंकिता लोखंडे आणि नंतर मन्नारा चोप्राही बाहेर पडली. त्यानंतर अभिषेक आणि मुनव्वर यांच्यापैकी मुनव्वर याला सर्वाधिक मते मिळाली. त्यानंतर त्याला या हंगामाचा विजेता घोषित करण्यात आलं. मुनव्वरचा विजयानंतर मुंबईतील डोंगरी येथे स्थानिकांनी आनंद साजरा केला.

बिग बॉस ट्रॉफी आणि बक्षीस रक्कम : बिग बॉस जिंकल्यावर मुनव्वर फारुकीला केवळ ट्रॉफीच मिळाली नाही, तर त्यासोबतच त्यांना 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक कारही देण्यात आली. या ट्रॉफीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती शोच्या दिल, दिमाग आणि दम या थीमवर आधारित आहे. विजयानंतर मुनव्वर फारुकी सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडीगला आला. सध्या त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

बिग बॉस 17 चे स्पर्धक : मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी यांच्याशिवाय या शोमध्ये सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांची नावे आहेत. त्याचबरोबर विकी जैन, ईशा मालवीय, जिग्ना व्होरा, नावेद सोले, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, अनुराग डोवाल, सना रईस खान, सोनिया बन्सल, खानजादी, सनी आर्या आणि रिंकू धवन हे स्पर्धक होते.

हेही वाचा :

1 प्रसिद्ध पॉप स्टार 'डॅनी ली'चं लिपोसक्शन सर्जरीमुळं निधन; का केली जाते ही सर्जरी?

2 अमिताभ बच्चनचा मजेशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो

3 69व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सॅम बहादूरनं केली कमालीची कामगिरी, विजेत्यांची यादी येथे पाहा

Last Updated : Jan 29, 2024, 7:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.