मुंबई - Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया 3' या चित्रपटाबाबत आता रिलीजपूर्वी अनेक अपडेट्स येताना दिसत आहेत. कालचं 25 सप्टेंबर रोजी नवीन पोस्टर निर्मात्यांनी रिलीज केलं होतं. कालच्या पोस्टरमध्ये झपाटलेल्या दरवाजाची झलक दाखवण्यात आली होती. यावर तंत्र , मंत्र आणि एक मोठ कुलूप असल्याचं दाखवण्यात आलं होतं. आज 27 सप्टेंबर रोजी पुन्हा निर्मात्यांनी एक पोस्टर रिलीज केलंय. यामध्ये आता मंजुलिका आणि रूह बाबा यांची झलक दाखवण्यात आली आहे. 'भूल भुलैया 3'चं नवीन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आता या पोस्टरवर अनेक यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
'भूल भुलैया 3 'मधील पोस्टर रिलीज : 'भूल भुलैया 3'चं नवीन पोस्टर खूपचं धमाकेदार आहे. पोस्टरमध्ये मंजुलिका आणि रूह बाबा समोरासमोर उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान कार्तिक आर्यनसह चित्रपटाच्या सर्व स्टार कास्टनं त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे पोस्टर शेअर केले आहे. कार्तिक आर्यननं हे पोस्टर शेअर करत पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिलं, 'रूह बाबा वर्सेज मंजुलिका. या दिवाळीला भूल भुलैया 3, ही दिवाळी भूल भुलैया वाली.' 'भूल भुलैया 3'मधील पोस्टरचं आता सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत आहेत. या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'खूप सुंदर पोस्टर आहे, या चित्रपटासाठी उत्सुक आहे.' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं,'यावेळी तर भूतांचा मेळावा असेल.' आणखी एकानं लिहिलं, 'रूह बाबा येत आहे.' याशिवाय अनेकजण या पोस्टला लाईक करत आहेत.
'भूल भुलैया 3'ची स्टार कास्ट : कार्तिक आर्यनच्या या वर्षीच्या बहुप्रतीक्षित हॉरर कॉमेडी चित्रपटात विद्या बालन, तृप्ती डिमरी, राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा आणि अश्विनी काळसेकर यांसारखे कलाकार आहेत. माधुरी दीक्षित देखील या चित्रपटाचा एक भाग असणार असल्याची बातमी आहे. विद्या बालन आणि माधुरी दीक्षितचा एक खास डान्स सीक्वेन्स देखील यात असणार आहे. बॉलिवूड दिग्दर्शक अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' ची निर्मिती टी-सीरीजनं केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'भूल भुलैया 3'ची बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'शी टक्कर होणार आहे.
हेही वाचा :