मुंबई - Bastar The Naxal Story Trailer OUT : विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन यांचा आगामी चित्रपट 'बस्तर: द नक्सल स्टोरी' हा संध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अदा शर्मा दिसणार आहे. विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन आणि अदा शर्माच्या त्रिकूटानं यापूर्वी 'द केरळ स्टोरी' सारखा उत्कृष्ट चित्रपट दिला आहे. 'बस्तर: द नक्सल स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे. निर्मात्यांनी 'बस्तर: द नक्सल स्टोरी'चा ट्रेलर आज 5 मार्च रोजी रिलीज केला आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाकडून अनेकांना खूप अपेक्षा आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'बस्तर: द नक्सल स्टोरी'चा ट्रेलर रिलीज : 'द केरळ स्टोरी'च्या जबरदस्त यशानंतर, या चित्रपटाची टीम आणखी एका धाडसी आणि प्रभावशाली बनली आहे. आता ही टीम एक नवीन कहाणी घेऊन समोर आली आहे. आता 'बस्तर: द नक्सल स्टोरी'चा ट्रेलर प्रत्येकाच्या अपेक्षांवर खरा उतरत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नक्षलवाद्यांकडून सीआरपीएफ जवान मारले जात असल्याचं दिसत आहे. काश्मीरमधील मतदारसंघात देशाच्या सैनिकांच्या मृत्यूचा आनंद कसा साजरा केला जातो हे देखील दाखवले जात आहे. राष्ट्रगीत गाताना माणसांना कापल्याच्या दृश्यांपासून ते लहान मुलांना जाळण्यापर्यंत, राजकीय व्यक्तींवर गोळीबार आणि निरपराधांना फासावर लटकवण्यापर्यंतचा हा ट्रेलर थरारक आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'बस्तर: द नक्सल स्टोरी' चित्रपटाबद्दल : हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. ट्रेलरचे मुख्य आकर्षण म्हणजे अभिनेत्री अदा शर्माने साकारलेली आयपीएस नीरजा माधवनची व्यक्तिरेखा आहे. ट्रेलरमध्ये अदानं पात्रात आणलेली परिपूर्णता आणि प्रामाणिकपणा तिच्या व्यक्तिरेखेतून स्पष्टपणे दिसून येत आहे. अदा ही 'बस्तर: द नक्सल स्टोरी' आणखी ठोस कामगिरी करणार असल्याचं दिसत आहे. 'बस्तर: द नक्सल स्टोरी' पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाइन पिक्चर्स द्वारे निर्मित आणि आशिन ए शाह द्वारे सह-निर्मित, 'बस्तर: द नक्सल स्टोरी' 15 मार्च 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.
हेही वाचा :