ETV Bharat / entertainment

'बजरंगी भाईजान'च्या सीक्वेलबद्दल केला कबीर खाननं खुलासा, वाचा सविस्तर - Bajrangi Bhaijaan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 1:04 PM IST

Bajrangi Bhaijaan 2: 'बजरंगी भाईजान' चित्रपटच्या सीक्वेलच्या एक अपडेट समोर आली आहे. 'बजरंगी भाईजान' चित्रपटाची सीक्वेलची स्क्रिप्ट अद्याप तयार नसल्याचं सांगण्यात आलंय.

Bajrangi Bhaijaan 2
बजरंगी भाईजान 2 (कबीर खान (फाइल फोटो) (IANS))

मुंबई - Bajrangi Bhaijaan 2 : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं तीन वर्षांपूर्वी मुंबईतील 'आरआरआर' प्री-रिलीज इव्हेंटमध्ये त्याचा 2015 मधील हिट चित्रपट 'बजरंगी भाईजान'च्या अधिकृत सीक्वेलची घोषणा केली होती. सीक्वेलची कहाणी एसएस राजामौली यांचे वडील के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. याशिवाय कबीर खाननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता पुन्हा एकदा 'बजरंगी भाईजान' बहुप्रतीक्षित सीक्वेलबद्दल चर्चा होताना दिसत आहे. अलीकडेच कबीर खाननं 'बजरंगी भाईजान'च्या सीक्वेलच्या त्याच्या प्लॅनबद्दल उघडपणं सांगितलं आहे.

'बजरंगी भाईजान' चित्रपटाचा सीक्वेल चर्चेत : एका मुलाखतीत कबीर खान म्हटलं की, "बजरंगी हे खरोखरच एक आयकॉनिक पात्र आहे. ही व्यक्तिरेखा सर्वांनाचं मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहायची आहे, अनेकदा प्रेक्षकांकडून ऐकायला मिळते की, 'बजरंगी भाईजान' दुसरा भाग कधी येईल. कबीर खान पुढं सांगितलं, "पहिला चित्रपट मुन्नीभोवती फिरत असल्यानं, पात्राची कहाणी समाप्त झाली होती." या चित्रपटाच्या निर्मात्यानं सांगितलं की, "कहाणी पुढे नेण्याचं अनेक मनोरंजक मार्ग आहेत. बजरंगीला पुढे नेण्याचे अनेक मनोरंजक मार्ग आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्ट अद्याप तयार नाही, परंतु माझ्याकडे काम करण्यासाठी काही मनोरंजक कल्पना आहेत."

दिग्दर्शक कबीर खानचं वर्कफ्रंट : याशिवाय कबीर खाननं पुढं सांगितलं, "बजरंगी भाईजान'ची कहाणी ही बजरंगी आणि चांद नवाबच्या साहसांवर आधारित होती. या चित्रपटात बजरंगीची भूमिका सलमान आणि चांद नवाबची पात्र नवाजुद्दीन साकारलं होत. सलमान खान स्टारर हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. बजरंगी भाईजान' चित्रपटानं जगभरात 922.17 कोटीची कमाई केली होती. दरम्यान, कबीर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन दिसणार आहे. हा चित्रपट 14 जून रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. 'चंदू चॅम्पियन' चित्रपट 90 कोटीच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमार स्टारर 'सरफिरा'चा ट्रेलर होईल 'या'दिवशी रिलीज - SARFIRA TRAILER
  2. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा प्रोमो व्हायरल, सानिया मिर्झानं कपिल शर्माची उडवली खिल्ली... - sania mirza
  3. 'भूल भुलैया'मध्ये अक्षय कुमारनंतर सलमान खानची जागा घेऊ शकतो कार्तिक आर्यन - kartik aryan replaces salman khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.