मुंबई - Ayushmann Khurrana meets Eric Nam : साऊथ कोरियाचा गायक एरिक नम भारतात आला आहे. या भेटीत तो आपल्या मित्रासोबत मुंबईच्या रस्त्यांवर मजा मस्ती करताना आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. लोल्लापलूझा 2024च्या शोसाठी भारतात पोहोचलेल्या एरिकबद्दल, जेव्हा आयुष्मान खुरानाला समजले की तो मुंबईत येत आहे, तेव्हा तो लगेच त्याच्या मित्राच्या भेटीला गेला. त्यानं एरिकला नेहमी स्मरणात राहणारा जेवणाचा अनुभव दिला आहे. मागच्या वर्षी सिंगापूरमध्ये टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये आयुष्मान खुरानाची भेट एरिक नमशी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली आहे.
आयुष्मान खुरानानं एरिकला स्वादिष्ट पदार्थ खाऊ घातले : एरिक आणि आयुष्मान यांच्यात खूप चांगले बाँडिंग आहे. यामागचे कारण म्हणजे दोघेही गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत. या दोघांनाही प्रतिष्ठित टाईम मासिकानं जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून गौरवले आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे दोघेही खाण्याचे शौकीन आहेत. आयुष्मानने एरिकला लाल चटणी, पिंडी छोले अमृतसरी कुलचा, हैदराबादी गोश्त की बिर्याणी सोबत रायता आणि लोकप्रिय रास मलाई गोड सोबत कांदा भजीचा आस्वाद देखील दिला आहे.
आयुष्मान खुराना आणि एरिक नम : आयुष्मान खुरानानं याबद्दल बोलताना म्हटलं, ''मला समजले की एरिकला जेवणाची खूप आवड आहे आणि मला त्याला आपल्या देशातील लोकप्रिय असणारी डिश खायला द्यायचे होते, जे तो कधीही विसरणार नाही! आपला सुंदर अतुलनीय भारत देश आपल्या सौंदर्यासाठी जगभर ओळखला जातो! आपल्याकडे अनेक संस्कृती आणि विविध अभिरुची आहेत. भारतीय खाद्यपदार्थ हे खूप स्वादिष्ट आहेत आणि माझा 'अतिथी देवो भव' वर विश्वास आहे. दरम्यान, स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद घेतल्यानंतर एरिकनं नम म्हटलं की, आयुष्मान हा एक चांगला मित्र आहे आणि त्याची स्वागत शैली देखील खूप विशेष आहे. आम्ही भारतभर एक छोटा पण स्वादिष्ट प्रवास केला, मला स्वादिष्ट खाद्यपदार्थ खायला खूप आवडतात, म्हणून त्यानं मला या सुंदर देशातील काही सर्वात स्वादिष्ट पदार्थांबद्दल सांगितले. मला भारत आवडतो. याशिवाय मला तुमच्या देशात एक मजेदार अनुभव आला. यासोबत त्यानं मला सांगितलं की त्याची आवडती डिश छोले आणि रोटी आहे'.
हेही वाचा :