ETV Bharat / entertainment

केएल राहुल आणि अथिया शेट्टी खरोखरच होणार का पालक? सत्य आलं बाहेर... - ATHIYA SHETTY AND KL RAHUL - ATHIYA SHETTY AND KL RAHUL

Athiya Shetty Pregnant? : अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल हे आई वडील होणार असल्याची हिंट सुनील शेट्टीनं एका शो दररम्यान दिली होती. आता या बातमीबाबत एक सत्य समोर आलं आहे.

Athiya Shetty Pregnant?
अथिया शेट्टी प्रेग्नेंट ?
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 2:58 PM IST

मुंबई - Athiya Shetty Pregnant? : हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल जानेवारी 2023 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊसवर कुटुंबीय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत या जोडप्यानं सात फेरे घेतले होते. या जोडप्यानं नेहमीच त्यांचं नातं खाजगी ठेवलं आहे. सोशल मीडियावर देखील क्वचितच हे जोडपे एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती की, अथिया शेट्टी आई होणार आहे. आता बातमीबाबत सत्य जाणून घेऊया.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल बनणार पालक ? : अलीकडेच अभिनेता सुनील शेट्टीनं हिंट दिली होती की, अथिया शेट्टी ही आई होणार आहे. यानंतर सोशल मीडियावर अथिया आणि केएल राहुलबद्दल अनेक बातम्या समोर आल्या होत्या. सुनील शेट्टीनं एका डान्स शोमध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुल पालक होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर त्याचे चाहते खूप खुश झाले होते. सुनील शेट्टी हा एका डान्स रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून गेला होता. शोची होस्ट भारती सिंगनं गंमतीत सुनीलला विचारलं होतं की तो कसा आजोबा असेल. यावर प्रतिक्रिया देताना त्यानं म्हटलं होतं की, ''होय, पुढचा सीझन येईन तेव्हा मी आजोबासारखा रंगमंचावर फिरेन.''

चाहत्यांचे मनं दुखावली : सुनील शेट्टीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. केएल राहुल आणि अथिया शेट्टी पालक बनणार आहेत की नाही याचा अंदाज चाहते लावू लागले होते. मात्र आता लेटेस्ट माहितीनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी आई-वडील बनणार असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. मात्र हे जोडपे लवकरच आनंदाची बातमी देईल अशी अपेक्षा चाहते आता करत आहेत. दरम्यान अथिया शेट्टीबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला चित्रपट 'हिरो' होता. या चित्रपटामध्ये ती सूरज पांचोलीबरोबर दिसली होती. त्यानंतर ती शेवटी ती नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर 'मोतीचूर चकनाचूर' या कॉमेडी ड्रामा चित्रपटामध्ये दिसली होती.

हेही वाचा :

  1. सोनाक्षी सिन्हाच्या नखरेल अदांनी सजलेलं 'हीरामंडी'तील 'तिलस्मी बहीन' गाणं लॉन्च - Heeramandi Song launch
  2. इफ्तार पार्टीमधील व्हिडिओमुळे अरबाज खान आणि शशुरा खान झाले ट्रोल - arbaaz khan and shura khan
  3. विजय-मृणाल स्टारर 'फॅमिली स्टार'ने रचला इतिहास, हा टप्पा गाठणारा ठरला पहिला भारतीय चित्रपट - FAMILY STAR RELEASE

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.