मुंबई - Suniel Shetty Birthday : अभिनेता सुनील शेट्टी आज 11 ऑगस्ट रोजी त्याचा 63वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी अनेकजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया आणि पत्नी माना शेट्टी (मोनिशा कदरी)नं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुनील शेट्टीची मैत्रीण शिल्पा शेट्टीनंदेखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रविवारी अथियानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर वडील सुनील शेट्टी यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. अथियानं इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. एक फोटो तिच्या लग्नाचा आहे. तर दुसरा फोटो हा तिच्या बालपणीचा आहे. यात तिला वडील मांडीवर घेऊन फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.
अथियानं दिल्या वडील सुनील शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा : अथियानं इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या लग्नातील वडील सुनील यांचा फोटो पोस्ट करत यात कॅप्शनमध्ये लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा माझा मित्रा, सर्वोत्तम वडील आणि सर्वोत्तम व्यक्ती. तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्याकडून दररोज शिकायला मला आवडते." दुसऱ्या फोटोच्या पोस्टमध्ये तिनं फोटो रेड हार्ट इमोजी जोडला आहे. दुसरीकडे सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टीनंदेखील त्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुनीलबरोबरचा एक फोटो पोस्ट केला. यात कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "हॅपी बर्थडे जान. मी व्यक्त करू शकेन त्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते.' फोटोत हे जोडपे नदीच्या काठावर असल्याचं दिसत आहे.
शिल्पा शेट्टीनं दिल्या सुनील शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा : अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सुनील शेट्टीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं इंस्टाग्राम स्टोरीवर सुनील शेट्टीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला. हसरा चेहरा आणि लाल हृदय इमोजीसह कॅप्शन तिनं लिहिलं "शेट्टी... युनिव्हर्स तुम्हाला आणखी प्रेम, चांगले आरोग्य लाभो. खूप प्रेम." सुनील शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'धारावी बँक', 'हेराफेरी 3', 'हेलो इंडिया' आणि 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
- सुनील शेट्टी लवकरच एका थ्रिलर चित्रपटात अॅक्शन करताना दिसेल, दमदार लूक झाला व्हायरल - Sunil Shetty
- सुनील शेट्टीनं जावई केएल राहुलला 32व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा, केला फोटो शेअर - KL Rahul 32nd Birthday
- केएल राहुल आणि अथिया शेट्टी खरोखरच होणार का पालक? सत्य आलं बाहेर... - ATHIYA SHETTY AND KL RAHUL