मुंबई - राज आचार्य दिग्दर्शित 'मर्डर इन माहीम' ही आगामी मालिका सामाजिक भाष्य करणारी, भयंकर हत्येचा तपास घेणारी आणि महानगरी मुंबईच्या अधोगतीचा शोध घेणारी आहे. पीटर (आशुतोष राणा) आणि झेंडे (विजय राज) यांच्यातील हरवलेल्या नातेसंबंधावर, त्यांच्या एकत्र येण्यावर, समझोत्यावर भाष्य करणारे काही प्रसंग या मालिकेत गुंफण्यात आले आहेत. या मालिकेबद्दल बोलताना आशुतोष राणाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना खुलासा केला की, ही मालिका म्हणजे एक मर्डर मिस्ट्री आहे. यात सस्पेन्स, ड्रामा, भावना आणि गुन्हेगारी यांसह विविध मनोरंजक घटक आहेत. या मालिकेत आशुतोषने पीटर फर्नांडिस या निवृत्त पत्रकाराची भूमिका साकारली आहे.
अभिनेता आशुतोष राणाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्याच्या आगामी वेब सीरिज 'मर्डर इन माहीम'बद्दल अधिक माहिती दिली. मुलाखतीत आशुतोषने सांगितलं की, "प्रेक्षकांना या व्यक्तिरेखेमध्ये ताकद दिसेल. आमच्या दिग्दर्शकाने चित्रपटातील कठीण प्रसंग कुशलतेनं हाताळले आहेत." एका निवृत्त पत्रकाराची भूमिका साकारत असलेल्या राणाने त्याच्या व्यक्तिरेखेतील सामर्थ्यावरील ताकद अधोरेखित करताना सस्पेन्स उलगडण्यासाठी तो साकारत असलेल्या पत्रकाराच्या पात्राच्या दृष्टिकोनावर चर्चा केली.
जेरी पिंटो यांच्या कादंबरीवर आधारित, राज आचार्य दिग्दर्शित आगामी 'मर्डर इन माहीम' वेब सिरीज 10 मे रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. ही मालिका माहीममधील एका खुनाच्या पार्श्वभूमीवर असून त्यानंतर होणाऱ्या सखोल तपासावर आहे. शिवानी रघुवंशी आणि शिवाजी साटम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेची निर्मिती 'टिपिंग पॉइंट फिल्म्स'च्या बॅनरखाली करण्यात आली आहे.
आशुतोष राणा यांच्या वर्कफ्रंटचा विचार केला तर तो 'दुश्मन' आणि 'संघर्ष' यांसारख्या चित्रपटातील भूमिकांसाठी प्रसिद्ध असून त्यानं 'पठाण', 'वॉर', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'धडक', 'सिम्बा' आणि 'राझ' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या आगामी 'वॉर 2' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि एनटीआर ज्युनियर देखील मुख्य भूमिकेत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित, 'वॉर 2' चित्रपट 2025 च्या स्वातंत्र्यदिनी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो 'गँग्स ऑफ गाझियाबाद'मध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि सनी लिओनीबरोबर दिसणार आहे. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे.
हेही वाचा -
- '12वी फेल' स्टारचे कॅब ड्रायव्हरशी भांडण कॅमेऱ्यात कैद, सामान्य माणसासारखा लढला विक्रांत मॅसी - Vikrant Massey
- मेगास्टार चिरंजीवी आणि ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मविभूषण प्रदान - Padma Vibhushan Chiranjeevi
- ऑस्कर म्युझियममध्ये गर्जणार भारतीय सिनेमाचं संगीत, 'आरआरआर' आणि 'लगान' उडवणार खळबळ - Indian Cinema Music at Oscar Museum