ETV Bharat / entertainment

'आर्टिकल ३७०' चित्रपटाने 25 कोटींचा टप्पा पार केला, विद्युत स्टारर 'क्रॅक' पिछाडीवर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 10:48 AM IST

Article 370 vs Crakk BO Day 4: विद्युत जामवाल अभिनीत अ‍ॅक्शनर चित्रपटाने भरलेला बॉलिवूड थ्रिलर 'क्रॅक' शुक्रवारी, २३ फेब्रुवारी रोजी यामी गौतमच्या 'आर्टिकल ३७०' सोबत थिएटरमध्ये दाखल झाला. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने सातत्याने पूर्वीपेक्षा जास्त कामगिरी केली आहे.

Article 370 vs Crakk BO Day 4
आर्टिकल 370 आणि क्रॅक

मुंबई - Article 370 vs Crakk BO Day 4: यामी गौतम आणि प्रियामणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'आर्टिकल 370' आणि विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल यांचा समावेश असलेला 'क्रॅक' हे दोन प्रमुख बॉलिवूड चित्रपट शुक्रवारी, 23 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी थिएटरमध्ये दाखल झाले. बॉक्स ऑफिसवरील संघर्षामुळे व्यवसायात अडथळा निर्माण झाला आणि चित्रपट भिन्न जॉनरचे असूनही दोघांमधील तुलना सुरू झाली. सोमवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार, यामी गौतम स्टारर 'आर्टिकल 370' ने 'क्रॅक'ला पिछाडीवर टाकले आणि चांगली कमाई केली.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित आणि यामी गौतमचा पती आदित्य धर निर्मित 'आर्टिकल 370' चित्रपटाने पहिल्या सोमवारी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करून, अंदाजे 3.25 कोटींची कमाई केली. यामी स्टारर चित्रपटाच्या कमाईचा आकडा पहिल्या दिवसाच्या तुलनेत जवळजवळ 40% कमी आहे, तर पहिल्या दिवसाच्या वाजवी मूल्यातील तोटा जवळजवळ शून्य आहे कारण पहिल्या दिवशी 99 रुपयांचा फ्लॅट प्लॅन होता ज्यामुळे आकड्यामध्ये लक्षणीय वाढ झाली होती. रिलीजच्या चार दिवसांनंतर, बॉक्स ऑफिसवर 'आर्टिकल 370' ची एकूण कमाई 26.15 कोटी रुपये आहे, पहिल्या आठवड्यात जवळपास 34-35 कोटी रुपयांची कमाई होण्याची अपेक्षा आहे.

पुढील आठवड्यात कोणतीही भरीव स्पर्धा नसताना, हॉलीवूड रिलीझ 'Dune 2' वगळता, 'आर्टिकल 370' हे दुसऱ्या आठवड्यात सर्वात लोकप्रिय चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या वीकेंडवरील होल्ड चित्रपटाचा पुढच्या वाटचालीचा मार्ग ठरवेल. हा राजकीय थ्रिलर चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

'आर्टिकल 370' चित्रपटाचे रिलीज क्रॅकसह झाल्यामुळे 'क्रॅक'ला मोठा फटका बसल्याचे दिसते. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार चित्रपटाने चार दिवसांच्या थिएटर रनमध्ये 9.70 कोटी रुपयांची कमाई केली. 100 कोटी रुपयच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कमाई फारच तोकडी झाली आहे. त्यामुळे चित्रपटाचे बजेट बॉक्स ऑफिसवरील कमाईतून पूर्ण होईल ही अपेक्षा फारच धुसर बनली आहे.

चौथ्या दिवशी सोमवारी 'क्रॅक' चित्रपटाने 1.00 कोटी रुपयांची कमाई केली, जी मागील दिवसाच्या तुलनेत 55.65% ची नाट्यमय घट आहे. 26 फेब्रुवारी रोजी, चित्रपटाचा एकूण हिंदी व्यवसाय दर 10.46% होता. आदित्य दत्त दिग्दर्शित या चित्रपटात विद्युत जामवाल यांच्यासह नोरा फतेही, अर्जुन रामपाल आणि एमी जॅक्सन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. अमिताभ बच्चनची कारकीर्द उजवळणारे मनमोहन देसाई, 23 पैकी 15 चित्रपट ब्लॉकबस्टर बनवणार निर्माता
  2. सिद्धार्थ मल्होत्राने नवीन पोस्टरसह 'योद्धा' चित्रपटाच्या ट्रेलरची वाढवली उत्कंठा
  3. सामंथाची फिल्म इंडस्ट्रीत 14 वर्षे, समकालीन नयनताराने दिल्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.