ETV Bharat / entertainment

विराट-अनुष्काला पुत्ररत्न, मुलाचं ठेवलं 'हे' अनोखं नाव - विराट कोहली अनुष्का शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली दुसऱ्यांदा पिता झालाय. गेली अनेक दिवसांपासून विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. विराटनं आज (दि. 20 फेब्रुवारी) रोजी इंस्टाग्राम पोस्टवर मुलगा झाल्याची माहिती दिली आहे. अनुष्का शर्मा (दि. 15 फेब्रुवारी) रोजी दुसऱ्यांदा आई झाली आहे. विराटनं मुलाचं नावही सांगितलं आहे.

Anushka Sharma Virat Kohli
विराट-अनुष्का
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 11:03 PM IST

मुंबई : भारतातील सर्व क्रिकेटप्रेमी आणि सिनेप्रेक्षकांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या दोन्ही कुटुंब लंडनमध्ये असल्याचीही माहिती समोर आली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. तसंच, गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनुष्का आणि विराट माध्यमांपासून दूर असल्याचंही पाहायला मिळालं. आज विराटने आपल्या इंस्टाग्रामवरून मुलगा झाल्याची माहिती दिली आहे.

मुलाच्या नावाचा अर्थ काय आहे? : विराटने आपल्या मुलाचं नावही शेअर केलं आहे. विराटनं लिहिले की, वामिकाचा लहान भाऊ 'अकाय' या जगात आला आहे. विराटच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अकाय नावाच्या अर्थ काय अशी चर्चा सुरू झाली आहे. अकायचा अर्थ शोधला असता, अकायचा अर्थ 'निराकार' असा अर्थ होतो.

तुम्हाला वामिकाचा अर्थ माहित आहे का? : विराट आणि अनुष्कानं त्यांच्या मुलीचं नाव 'वामिका' ठेवलं आहे. या नावाचा अर्थ 'देवी' आणि दुर्गाशी संबंधित आहे. 'वामिका' हा दुर्गेचा समानार्थी शब्द आहे. वामिकाचा अर्थ शिव असाही होतो. या नावाचा अर्थ व्यक्तीच्या स्वभावाशी संबंधित आहे.

एबीडीने माफी मागितली होती : अनुष्का शर्माच्या गरोदरपणामुळे कोहलीनं इंग्लंडविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने खेळले नाहीत, असा दावा एबी डिव्हिलियर्सने केला होता. मात्र, नंतर त्यानं हे विधान मागे घेतलं. आणि यानंतर तो पुन्हा एकदा या मुद्द्यावर बोलला. त्यानं कोहली कुटुंबाची माफी मागितली. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर डिव्हिलियर्सनं ही माफी मागितली होती.

अभिनंदनाचा वर्षाव झाला : ही आनंदाची बातमी समजताच अनुष्का आणि विराटवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. आलिया भट्टने अनुष्काच्या पोस्टवर लिहिलं, 'किती सुंदर आहे. अभिनंदन.' मौनी रॉय, रकुल प्रीत सिंग, रणवीर सिंग, भूमी पेडणेकर, श्वेता बच्चन यांनी आनंद व्यक्त केलं आहे. दुसरीकडे, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, युझवेंद्र चहल, हरभजन सिंग, काजल अग्रवाल, कपिल शर्मा, दिया मिर्झा, सोनम कपूर, विक्रांत मॅसी यांनीही विराट कोहलीच्या पोस्टवर अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा :

1 नयनतारा कॅज्युअल लूकमध्ये झाली मुंबई विमानतळावर स्पॉट, पाहा व्हिडिओ

2 गेल्या '30 वर्षात 100 चित्रपट' केल्यानंतर मनीषा कोईराला घेतेय जगण्याचा शांत अनुभव

3 अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी'नं ओटीटीवर केला विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.