ETV Bharat / entertainment

'चतुरंग'च्या पन्नाशी निमित्त ११ 'चतुरंग सुवर्णरत्न सन्मान'ची घोषणा - Chaturang Suvarna Ratna Samman

Chaturanga Suvarna Ratna Samman - चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक संस्थेनं सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आयोजित केला आहे. मुंबईमध्ये भव्य असा सोहळा होणार आहे. या सोहळ्यात चतुरंग सुवर्णरत्न सन्मान देण्यात येतील. त्याची घोषणा करण्यात आली आहे. वाचा सविस्तर वृत्त...

चतुरंग सुवर्णरत्न सन्मान
चतुरंग सुवर्णरत्न सन्मान (Organizer)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 6:33 PM IST

मुंबई Chaturanga Suvarna Ratna Samman : कोकण खेड्यातल्या आपल्या शाळांसाठी आपण काहीतरी शालोपयोगी उपक्रम करूया अशा छोट्याशा उद्देशाने १९७४ च्या अक्षय्य तृतीयेला सुरू झालेल्या चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक संस्थेनं विविधांगी असे ६१ उपक्रम हाती घेतले. ही वाटचाल अशी होत गेली की यावर्षी अक्षय्य तृतियेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मुंबई पाठोपाठ डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा असा सहा केंद्रांवर आपला पसारा संस्थेनं वाढवला. महाराष्ट्रात सर्वदूर सुमारे २४० हून अधिक स्थळ - ठिकाणांचा वापर करीत ५० वर्षात १८०० हून अधिक कार्यक्रमांचा टप्पा संस्थेनं पार केला आहे. अर्थातच यासाठी त्यांना भरभरून सहकार्य पाठबळ पाठिंबा मिळाला तो सर्व क्षेत्रांतील असंख्य लोकप्रिय कलावंतांचा! नामवंत, गुणवंत अशा अनेक मान्यवरांचा! चतुरंग उभी राहायला, प्रस्थापित करायला ज्या-ज्या दिग्गजांनी, त्या त्या काळात चतुरंगला आधार दिला त्यांच्या प्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त करणारे आनंद सोहळे प्रतिष्ठानने मुंबई खेरीज रत्नागिरी, चिपळूण, गोवा, डोंबिवली, पुणे या अन्य केंद्रांवर मोठ्या झोकदारपणे आणि दिमाखात साजरे केले. आता सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मुंबईमध्ये भव्य प्रमाणावर करण्याचे योजिले आहे. या सोहळ्याचा केंद्रबिंदू असणार आहे चतुरंग सुवर्णरत्न सन्मान.

चतुरंग सुवर्णरत्न सन्मान मिळालेले मान्यवर
चतुरंग सुवर्णरत्न सन्मान मिळालेले मान्यवर (Organizer)

११ नामवंतांचा सत्कार - चतुरंगच्या हातून पार पडलेले सुमारे १८०० हून अधिक कार्यक्रम हे ज्यांच्या कला प्रेरणेने, प्रोत्साहनाने चतुरंगला साकार करता आले अशा १४ विद्या ६४ कलांपैकी किमान ११ क्षेत्रांतील नामवंत - गुणवंतांचा जाहीर सन्मान आपल्या हातून घडावा अशी योजना आहे. यातील किमान ११ जणांच्या उत्तुंग, लक्षवेधी, देदिप्यमान कारकिर्दीबद्दल आपल्या हातून त्यांचे जाहीर वंदन - पूजन घडावे या सदिच्छातून सुवर्णरत्न सन्मानाची संकल्पना पुढे आली. या सन्मानासाठी पं. उल्हास कशाळकर (गायन), पं. हरिप्रसाद चौरसिया (वादन), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शन), महेश एलकुंचवार (साहित्य), दिलीप प्रभावळकर (नाटक), रोहिणी हट्टंगडी (चित्रपट), वासुदेव कामत (चित्रकला), चंदू बोर्डे (क्रीडा), डॉ. अनिल काकोडकर (संशोधन) बाबासाहेब कल्याणी (उद्योजकता), मेजर महेश कुमार भुरे ( राष्ट्रीय सुरक्षा) अशी अकरा क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.

सन्मान सोहळ्यात विविध कार्यक्रम - या सर्व नामवंत मान्यवरांनी सन्मान स्वीकृतीसाठी संमती दर्शविलेली आहे. ते स्वतः यासाठी उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत निवड करण्यासाठी ११ क्षेत्रातील प्रत्येकी ३-३ मातब्बर - अनुभवी अभ्यासक अशा एकूण ३३ मान्यवर निवड समिती सदस्यांनी काम पाहिलेले आहे. त्या सर्वांच्या साक्षीने, त्यांच्याच उपस्थित हा 'चतुरंग सुवर्णरत्न सन्मान सोहळा' शनिवार - रविवार दिनांक २८ – २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईत दादरमध्ये पार पडणार आहे. याची चतुरंग प्रतिष्ठानकडून घोषणा करण्यात आली आहे. त्याप्रसंगी होणाऱ्या नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य, संवाद, गायन, वादन अशा विविध स्वरूपातील कार्यक्रमांचा तपशील लवकरच घोषित केला जाईल, असं प्रतिष्ठानने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचा..

  1. पर्यावरणपूरक सण साजरा करूया, अमृता फडणवीस यांचं आवाहन - Amruta fadnavis
  2. विजय देवरकोंडानं शेअर केले 'हॅट फेज' फोटो; चाहत्यानी विचारलं फोटो 'स्वीटहार्ट मंदान्ना'नं काढले का? - VIJAY DEVERAKONDA HAT PHASE 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.