मुंबई - Ankita lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कधी सुशांत सिंह राजपूत तर कधी तिच्या सासूमुळे अंकिता चर्चेत राहते. 'बिग बॉस 17' मध्ये ती तिचा पती विकी जैनबरोबर दिसली होती. या शोमध्ये या जोडप्यामध्ये खूप भांडणं पाहायला मिळाली होती. अंकिता लोखंडे तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या सासूनं भांडणादरम्यान मुलगा विक्की जैनला पाठिंबा दिला. यानंतर सासू रंजना जैननं तिला बिग बॉस शोमध्ये येऊन खूप सुनावलं होतं. आता पुन्हा एकदा 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे नवीन व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
अंकिता लोखंडेच्या सासूबाईंचे मनपरिवर्तन : बिग बॉसनंतर अंकिता लोखंडेची सासू खूप चर्चेत आली. या शोमध्ये सासूचा रागीट चेहरा लोकांना पाहिला मिळाला होता. अंकिता लोखंडे आणि रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान रंजना जैननं आपल्या सुनेचं खूप कौतुक केलं. तेव्हा अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. दरम्यान अंकितानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या सासूबरोबर दिसत आहे. दोघींना एकत्र पाहून यूजर्स कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. एकानं लिहिलं, "हे हृदयपरिवर्तन कसे आणि केव्हा झाले?.", तर दुसऱ्यानं कमेंट केली, "अरे, हे काय चालले आहे, कधीही ही बाई आपल्या सुनेबद्दल वाईट बोलते." आणखी एकानं लिहिलं, "अंकिता किती नाटक करते? "
अंकिता लोखंडेचा व्हिडिओ व्हायरल : अंकिता लोखंडे आणि तिची सासू या व्हिडिओमध्ये एकत्र मंदिरात जाताना दिसत आहेत. अंकितावर सासू प्रेमाचा वर्षाव करताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान अंकिताच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलीकडेच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात दिसली होती. ती भारती सिंगच्या नवीन कुकिंग आधारित कॉमेडी रिॲलिटी शो 'लाफ्टर शेफ' मध्ये पती विकी जैनबरोबर दिसत आहे. याशिवाय ती 'आम्रपाली' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
- दिलजीत दोसांझनं प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'मध्ये गायलं गाणं, प्रोमो रिलीज - Kalki 2898 AD First Song Promo out
- हनी सिंगनं बेस्ट फ्रेंड सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं दिलं आश्वासन - SONAKSHI SINHA ZAHEER IQBAL WEDDING
- शरद पवारांनी माझं चुटकीसरशी केलं काम, अशोक सराफांनी सांगितली 'खास' आठवण... - ashok saraf