मुंबई - kalki 2898 ad : 'कल्की 2898 एडी' रिलीज होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'कल्की 2898 एडी'नं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत 5 लाखांहून अधिक तिकिटे विकली आहेत. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या तिकिट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता आंध्र प्रदेश सरकारनं यासाठी सहमती दिली आहे. 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट देशातच नाही तर परदेशातही चर्चेत आहे. उत्तर अमेरिकेत चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. चित्रपटाची प्रसिद्धी लक्षात घेऊन आंध्र प्रदेश सरकारनं प्रभास स्टारर चित्रपटाच्या तिकिट दरात वाढ करण्यास परवानगी दिल्यानंतर याबद्दल चर्चा आता सोशल मीडियावर होत आहेत.
'कल्की 2898 एडी' तिकिटमध्ये वाढ : आंध्र प्रदेश सरकारनं सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये प्रति तिकिट 75 रुपये आणि मल्टिप्लेक्समध्ये 175 रुपयांनी वाढवण्याची परवानगी दिली आहे. या सुपर हाय बजेट चित्रपटासाठी राज्य सरकारनं ही वाढ दोन आठवड्यांसाठी दिली आहे. आंध्र सरकारनं 'कल्की 2898 एडी'च्या निर्माते अश्विनी दत्त यांना त्याचं पालन करण्याची विनंती केली आहे.' या निर्णयामागील कारण म्हणजे चित्रपटाची कमाई वाढवणे आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन, दिशा पटानी हे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 27 जूनला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे.
'कल्कि 2898 एडी' बद्दल : 'कल्की 2898 एडी'चं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत संतोष नारायणन यांनी दिलंय. वैजयंती मूव्हीज अंतर्गत सी. आसवानी दत्त निर्मित हा चित्रपट आहे. प्रभास या चित्रपटात ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपट अतिशय बारकाईनं तयार केला गेला आहे. हा चित्रपट बनवताना त्यांनी प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेतली आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेता कमल हासन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं ट्रेलर आणि टीझर हे चाहत्यांना खूप आवडलं आहे. आता अनेकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा :
- नाना पाटेकरनं 'वेलकम 3' नाकारला, केला मोठा खुलासा - NANA PATEKAR WELCOME 3
- 'पायरट्स ऑफ द कॅरिबियन' अभिनेता तामायो पेरीचा शार्क हल्ल्यात धक्कादायक मृत्यू - TAMAYO PERRY DIES
- खाऊ गल्लीत नीता अंबानींनी चाट समोस्यावर मारला ताव, चाटवाल्याला दिलं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण - NITA AMBANI EAT VARANASI CHAAT