ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चनला आठवला धोकादायक स्टंट्स, ना सुरक्षा कवच ना व्हिएफएक्स - Amitabh Bachchan dangerous stunts - AMITABH BACHCHAN DANGEROUS STUNTS

Amitabh Bachchan dangerous stunts : मेगास्टार अमिताभ बच्चनने सोशल मीडियावर स्टंट सीनचे शूटिंग करतानाचा एक अप्रतिम फोटो पोस्ट केला आहे. बच्चन नेहमीच आपल्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहून चाहत्यांना अनेक रंजक किस्से शेअर करत असतो.

Amitabh Bachchan dangerous stunts
अमिताभचा साहसी स्टंट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 10:41 AM IST

Updated : Apr 2, 2024, 6:46 PM IST

मुंबई - Amitabh Bachchan dangerous stunts : मेगास्टार अमिताभ बच्चननं अनेक प्रकारच्या चित्रपटांना आपल्या शंभर टक्के समर्पणानं आकार दिला आहे. 'सात हिंदुस्तानी' या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातून त्यानं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पूर्वी शूटिंग करताना बॉडी डबल्स किंवा अत्याधुनिक स्पेशल इफेक्ट्सचा वापर होत नसे. या सुविधांच्यामुळे आजच्या काळात शूटिंग करताना कलाकारांना अ‍ॅक्शन सीन्स आरामात आणि सुरक्षितपणे करण्यास मदत होते. अमिताभ यांनी आपल्या काळात केलेल्या एका धोकादायक सीनबद्दल सांगितलं आहे. त्यानं कोणत्याही सुरक्षा जाळ्याशिवाय अ‍ॅक्शन सीन कसा साकारला होता त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूडच्या शहेनशाह अमिताभने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून जीव धोक्यात घालून केलेल्या अ‍ॅक्शन सीनची आठवण झाली. त्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये अमिताभ एका कड्यावरुन खोल ठिकाणी उडी घेत असताना दिसत आहे. त्याकाळात असं साहस करणं हे खूपच जीवघेणं होतं, याची जाणीव आज बच्चनला आहे. पण प्रेक्षकांना खूश करण्यासाठी, त्यांना सीन खरा वाटावा यासाठी कलाकारांना कशा प्रकारच्या धोक्यांना सामोरं जावं लागत होतं याची उदाहरणच त्यानं सांगितलंय. "...अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठी ३० फूट उंच डोंगरावरून उडी घेतली...कोणतंही सुरक्षा कवच नाही, फेस रिप्लेसमेंट नाही, व्हिएफएक्स नाही.. आणि लँडिंग.. एरर .. गाद्यांवर.. जर तुम्ही नशीबवान असाल तर.. ते दिवस माझे होते मित्रांनो," असं बच्चनने फोटो शेअर करताना लिहिलंय.

बच्चननं फोटो शेअर करताच, त्याच्या समर्पित फॉलोअर्सनी कमेटं सेक्शन भरुन टाकलं आणि त्याच्याबद्दलचा अभिमान व्यक्त करत कौतुक केलं. एका युजरनं पोस्ट शेअर होताच लिहिले, "अमितजी तुम्ही नेहमीच सर्वोत्तम होता आणि नेहमीच राहाल." दुसऱ्या चाहत्याने कमेंट केली: "बरोबर सर....म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हणत असतो...रियल अ‍ॅक्शन हिरो....सॅल्यूट."

अमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये 'सात हिंदुस्तानी' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि तेव्हापासून ५ दशकांहून अधिक काळ लोटला आहे. 200 हून अधिक चित्रपटांमध्ये झळकलेल्या आणि त्यांपैकी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या या महानायकानं 'डॉन', 'जंजीर', 'शोले', 'अमर अकबर अँथनी' आणि बरेच काही यांसारखे अ‍ॅक्शन चित्रपट केले आहेत.

गेल्या वर्षी विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' या अ‍ॅक्शन चित्रपटात अमिताभनं टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांच्याबरोबर शेवटची भूमिका साकारली होती. रजनीकांत स्टारर 'वेट्टयान' या आगामी चित्रपटात अमिताभ काम करत असून हा अमिताभचा तमिळ पदार्पणाचा चित्रपट आहे. याशिवाय बिग बी आगामी 'कल्की 2898 AD' चे शूटिंग करत आहे. याचित्रपटात प्रभास, कमल हासन आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. अभिनेत्री आलिया भट्टनं करीना कपूर स्टारर 'क्रू' चित्रपटाचा दिला रिव्ह्यू , केली पोस्ट शेअर - alia bhatt
  2. बोनी कपूरनं 'नो एंट्री'च्या सीक्वलची केली घोषणा ; 'मिस्टर इंडिया'बद्दल केला खुलासा - Boney Kapoor
  3. जॅकलीन फर्नांडिसनं एक फोटो शेअर करुन चाहत्यांना इस्टरच्या दिल्या शुभेच्छा - Jacquelien Fernandez

Last Updated : Apr 2, 2024, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.