मुंबई - आपल्या पॉवरहाऊस परफॉर्मन्सच्या जोरावर बॉलिवूडवर आधिराज्य गाजवणाऱ्या विकी कौशलला UPG च्या लिटरेचर फेस्टीव्हल 2019 मध्ये पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यानं त्याच्या प्रवासाविषयी प्रेरणादायी भाषण देऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं होतं. त्यानं त्याच्या सुरुवातीच्या काळात 2 ते 3 हजार ऑडिशन्स देऊन तो आजच्या ठिकाणावर पोहोचला आहे. त्यामुळे अपयशानं निराश होऊ नये, असं तो म्हणाला होता. त्याची ही गोष्ट अशा असंख्य स्वप्न पाहणाऱ्यांची आहे जे आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवून मुंबईत संघर्ष करण्यासाठी दाखल होतात. फिल्मी जगताशी कोणताही संबंध नसताना तो जसा मुंबईत आला तसेच हजारो स्वप्नाळू कलाकार ब्रेक मिळेल या आशेनं ऑडिशनला जातात. पण ऑडिशन ग्रिलच्या बाबतीत विकीची कथा काही वेगळी नाही. कारण बॉलिवूडच्या अनेक दिग्गज स्टार्सना एकेकाळी अशाच संघर्षांचा सामना करावा लागला होता. अथक प्रयत्न करुन जिद्द न सोडता त्यांनी चिकाटीनं ऑडिशन्स दिल्या आणि प्रतिभेच्या जोरावर ते आज ग्लॅमरच्या दुनियेत पोहोचले आहेत.
रणवीर सिंगच्या एनर्जीपासून ते रश्मिका मंदान्नाच्या कन्नड भाषेतील संघर्षापर्यंत, या ऑडिशन टेप्स भारतातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांच्या विनम्र सुरुवातीची आठवण करून देतात.
रणवीर सिंगकडे सुरुवातीपासूनच एनर्जी
'बँड बाजा बारात' (2010) मधील रणवीर सिंगच्या पदार्पणानं बॉलिवूडमध्ये एका नवीन प्रतिभेचं आगमन झालं. करीना कपूर खानबरोबर 'व्हॉट वुमन वॉन्ट'मध्ये नुकत्याच झालेल्या संभाषणात, त्यावेळची कास्टिंग डायरेक्टर असलेल्या भूमी पेडणेकरनं त्याच्या ऑडिशनमधील एक मनोरंजक आठवण सांगितली. तिनं सांगितलं की, "जेव्हा रणवीर जुहू येथील आमच्या कास्टिंग ऑफिसमध्ये गेला होता, तेव्हा त्याची एनर्जी तशीच होती जी आज आपण रेड कार्पेटवर पाहतो. तेव्हाही तो अभूतपूर्व होता."
रणवीरच्या ऑडिशनची एक व्हायरल क्लिप, ही त्याच्या सुरुवातीच्या संघर्षापैकी एक असल्याचं मानली जातं. सोशल मीडियावर ती वारंवार पाहिली जाते. एका अॅक्टींग स्कूलच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेला व्हिडिओ, रणवीर आपल्या एनर्जीची झलक दाखवताना दिसतो. हीच त्याची ओळख बनली आहे.
अनुष्का शर्मा: मॉडेल ते लीडिंग लेडी
'रब ने बना दी जोडी' (2008) मधून प्रसिद्धीस आलेल्या अनुष्का शर्माकडं जुन्या ऑडिशन व्हिडिओंची मालिका आहे जी अनेकदा ऑनलाइन आढळते. अशीच एक क्लिप, ती फक्त 18 वर्षांची असताना तिच्या मागील मॉडेलिंग अनुभव आणि उंचीबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसते. अनुष्काचे नैसर्गिक आकर्षण आणि आत्मविश्वास तिच्या सुरुवातीच्या काळातही दिसून आला. नंतर तिनं 'पीके' आणि 'ए दिल है मुश्कील' सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या यशस्वी कारकिर्दीचा टप्पा सेट केला.
🌝❤#RashmikaMandanna #Pushpa2TheRule pic.twitter.com/3zfgJviViF
— S R E E | ಶ್ರೀ ✨ (@SreeDharaNEL) October 3, 2024
रश्मिका मंदान्ना: एक विनम्र सुरुवात
रश्मिका मंदान्ना ही भारतातील सर्वात जास्त मागणी असलेल्या आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. तिच्या सुरुवातीच्या दिवसांतील एका विशिष्ट व्हिडिओमध्ये ती 'गोपिलोला अन्नो' या चित्रपटासाठी ऑडिशन देताना दिसली आहे. त्याकाळात तिला कन्नड संवाद म्हणातानाही अडचण होती. मात्र प्रामाणिकपणे ते ती कबुल करताना यात ती दिसते. जेव्हा रश्मिकाचा हा व्हिडिओ पहिल्यांदा व्हायरल झाला, तेव्हा काही चाहत्यांना तिची एक अभिनेत्री म्हणून झालेली वाढ चकित करणारी वाटली. 'पुष्पा' चित्रपटाच्या निमित्तानं ती आता किती मोठी स्टार बनली आहे ते आपण पाहतो.
आलिया भट्ट: 'नवीन करीना'
एका प्रसिद्ध चित्रपट कुटुंबात जन्मलेल्या आलिया भट्टनं पारंपारिक ऑडिशन प्रक्रियेला मागे टाकलं ज्याला अनेक बाहेरील लोकांचा सामना करावा लागतो. राझी, गंगूबाई काठियावाडी आणि डार्लिंग्स सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासह तिचा बॉलीवूड प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' (2012) साठी तिची ऑडिशनची एक झलक पाहायला मिळते. यात ती 'वेक अप सिड'मधील एक दृश्य पुन्हा तयार करताना दिसते. ही ऑडिशन पाहून करण जोहरनं तिच्यातली अभिनय क्षमता हेरली आणि तिला 'नवीन करीना' म्हणून संबोधलं होतं.
'हिरोपंती'पूर्वी कृती सेनन
कृती सॅनन आता राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री-निर्माता बनली आहे. तिनं मॉडेलिंगमध्ये काम केल्यानंतर 'हिरोपंती' (2014) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटासाठी क्रितीच्या ऑडिशनचे सुरुवातीचे व्हिडिओ तिची कच्ची प्रतिभा दर्शवतात. तिच्या एका पहिल्या ऑडिशनमध्ये, ती पांढऱ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये दिसत असून आत्मविश्वासाने स्वतःला सादर करते आहे.
दिशा पटानीची व्यावसायिक ऑडिशन
बॉलीवूडमधील आणखी एक यशस्वी नाव असलेल्या दिशा पटानीचे एक ऑडिशन व्हायरल झाली आहे. तिचा एक व्हायरल ऑडिशन व्हिडिओ आहे ज्यामध्ये ती एका कोल्ड क्रीम कमर्शियलसाठी ऑडिशन देणारी 19 वर्षांची फ्रेश चेहऱ्याची मुलगी आहे. दिशा स्वत:ची ओळख करून देते आणि कॅमेऱ्यासाठी पोज देते. हा व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर प्रसारित केला जातो. त्यामुळे तो यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या ऑडिशन क्लिपपैकी एक बनला आहे. आज, दिशा कल्की 2898 एडी, बागी 2 आणि मलंग यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. परंतु तिचा सुरुवातीचा ऑडिशन व्हिडिओ चित्रपट उद्योगात मोठे होण्याआधी सर्वात महत्वाकांक्षी अभिनेत्री एका त्रासातून जात होती त्याची आठवण करून देतो.
रुपाली गांगुलीनेही 'अनुपमा'साठी ऑडिशन दिली होती
'अनुपमा' या हिट टीव्ही शोमधील भूमिकेसाठी लोकप्रिय असलेल्या रुपाली गांगुलीला भारतीय टेलिव्हिजनमधील एक प्रस्थापित चेहरा असूनही मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन द्यावी लागली होती. तिच्या सुरुवातीच्या दिवसांतील व्हायरल ऑडिशन व्हिडिओमध्ये ती तिच्या पात्राच्या आयकॉनिक लुकसारखी दिसणारी साडी परिधान करताना एक गंभीर सीन करताना दिसत आहे.
तृप्ती दिमरी: उज्ज्वल करिअरची कच्ची सुरुवात
'बुलबुल' आणि 'अॅनिमल' या चित्रपटासह खळबळ माजवलेल्या तृप्ती डिमरी हिनं इंडस्ट्रीत चांगली सुरुवात केली होती. लैला मजनू (2018) या तिच्या पहिल्या चित्रपटातील ऑडिशन व्हिडिओमध्ये ती किती अमॅच्युअर आहे ते लक्षात येते. अनेकांनी तिला तिच्या मेहनतीबद्दल श्रेय दिलं आहे.