ETV Bharat / entertainment

अल्लु अर्जुनच्या वाढदिवसाचे काऊंटडाऊन 'पुष्पा मास जत्रा'सह सुरू, निर्मांत्यांनी दिली नवी अपडेट - Pushpa 2 release preparations - PUSHPA 2 RELEASE PREPARATIONS

Pushpa Mass Jaathara: बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2 ची' आतुरतेनं वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी निर्मात्यांनी 'पुष्पा मास जत्रा' उपक्रमाला सुरुवात केली आहे. 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त 'पुष्पा 2' चा नवा टीझर रिलीज करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Pushpa 2 release preparations
अल्लु अर्जुनच्या वाढदिवसाचे काऊंटडाऊन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 8:00 PM IST

मुंबई - Pushpa Mass Jaathara: अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाचं काऊंट डाऊन सुरू झालंय. 'पुष्पा : द रुल' चित्रपटाच्या निर्मात्यांनी 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त 'पुष्पा मास जत्रा'सह एका भव्य उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. एप्रिल महिना सुरू होताच 'पुष्पा 2' ची चर्चा आणखी वाढली आहे.

'पुष्पा'चे निर्माता मैत्री मुव्हि मकर्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लिहिलंय, "पुष्पा मास जत्राची आजपासून सुरुवात होत आहे. बहुपर्तीक्षित घोषणा आज 4 वाजून 5 मिनीटांनी करत आहोत. 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात पुष्पा द रुलचे ग्रँड रिलीज होत आहे."

अखेर नवीन अपडेट देत निर्मात्यांनी 8 एप्रिल रोजी 'पुष्पा 2' चा नवा टीझर रिलीज करणार असल्याची घोषणा केली. 'पुष्पा' दुहेरी आग घेऊन येत असल्याचेही या निमित्तानं जाहीर करण्यात आलंय. या निमित्तानं रिलीज करण्यात आलेल्या नव्या पोस्टरमध्ये पायात घुंगरांचा चाळ बांघल्याचं दिसत. लाल रंगाच्या उधळण झालेल्या ठिकाणी गिरकी घेण्याच्या तयारीत असलेलं पाऊल यात दिसतंय. हे पाऊल अल्लु अर्जुनचंच असणार असल्याचा कयास चाहते बांधत आहेत.

'पुष्पा 2: द रुल' हा या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षक त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच्या रिलीजच्या संबंधी चाहत्यांमध्ये अमाप उत्साह आहे हे स्पष्ट आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी भव्य थिएटरमध्ये पदार्पण करण्यासाठी या चित्रपटाचं सध्या पोस्ट-प्रॉडक्शन चालू आहे. निर्माते सिनेमॅटिक मास्टरपीस चाहत्यांना बहाल करण्याची जय्यत तयारी करत आहेत.

जसजसा अल्लू अर्जुनचा वाढदिवस 8 एप्रिल जवळ येत आहे, तसतसे चाहत्यांना आनंदी करण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन 'पुष्पा'चे निर्माते करत आहेत. यापूर्वी, रश्मिका मंदान्नानं 'पुष्पा 2' हा पहिल्या भागापेक्षा अधिक भव्य असणार असल्याचं सांगितलं होतं. 2021 मध्ये पुष्पा: द राइजच्या यशानंतर अल्लू अर्जुनचे 'पुष्पा 2: द रुल'मध्ये पुनरागमन होत असून, सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा भव्य चित्रपट यंदाचे सर्वात मोठं आकर्षण असणार आहे.

हेही वाचा -

  1. वरुण धवनने शेअर केला 'बेबी जॉन' सेटवरील फोटो, शूटिंगचा '७० वा दिवस' असल्याचा केला खुलासा - Varun Dhawan next movie
  2. अमिताभ यांनी समुद्राखालील बोगद्यातून केला पहिल्यांदा प्रवास, व्हिडिओसह शेअर केला अद्भूत अनुभव - Amitabh traveled undersea tunnel
  3. अमिताभ यांनी समुद्राखालील बोगद्यातून केला पहिल्यांदा प्रवास, व्हिडिओसह शेअर केला अद्भूत अनुभव - Amitabh traveled undersea tunnel

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.