ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 - द रुल'मधील क्लायमॅक्सचं शूटिंग सुरू, व्हिडिओ क्लिप केली शेअर - pushpa 2 the rule - PUSHPA 2 THE RULE

Pushpa 2 The Rule : 'पुष्पा 2 - द रुल' चित्रपटामधील क्लायमॅक्स शूट केला जात आहे. याबद्दल आता निर्मात्यांनी एक व्हिडिओ क्लिप शेअर करून माहिती दिली आहे.

Pushpa 2 The Rule
पुष्पा 2 द रूल ('पुष्पा 2 द रूल' (Screen Grab From Teaser))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 2:13 PM IST

मुंबई - Pushpa 2 The Rule : अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 - द रुल' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचा सध्या अंतिम टप्पा सुरू आहे. दरम्यान 'पुष्पा 2 - द रुल' चित्रपटामधील क्लायमॅक्स शूट केला जात आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. 'पुष्पा 2 - द रुल'च्या शूटिंगची अपडेट्स जारी करून निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. 'पुष्पा 2 - द रुल'च्या ॲक्शन सीक्वेन्स क्लायमॅक्सची माहिती देताना, निर्मात्यांनी एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये अल्लू अर्जुनची दमदार शैली पाहायला मिळत आहे.

'पुष्पा 2 - द रुल'चं शूटिंग : 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मात्यांनी या पोस्टवर लिहिलं आहे की, "पुष्पा 2 द रुल'चे शूटिंग सुरू आहे आणि क्लायमॅक्ससाठी ॲक्शन सीन शूट केले जात आहे. 'पुष्पा 2 - द रुल' 6 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे." ही अपडेट अशावेळी समोर आली आहे, ज्यावेळी अल्लू अर्जुन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांच्यात मतभेदाच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, निर्मात्यांनी या सर्व गोष्टींना अफवा असल्याचं म्हणत वादांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 'पुष्पा 2 - द रुल' आधी 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणामुळे या चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटाचं शूटिंग बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे.

'पुष्पा 2 - द रुल'मधील स्टार कास्ट : 'पुष्पा 2 - द रुल' चित्रपट हा बॉक्स ऑफिस जबरदस्त कमाई करेल, असा चित्रपट विश्लेषकांचा अंदाज आहे. याआधी या चित्रपटामधील 'सूसेकी' या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली आहे. 'पुष्पा 2 - द रुल' चित्रपट 'पुष्पा द राईज'चा सीक्वेल आहे. हा चित्रपट 2021मध्ये रिलीज झाला होता या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई केली होती. या चित्रपटामधील गाणीदेखील खूप हिट झाली होती. 'पुष्पा 2 - द रुल' मध्ये अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, फहद फासिल, विजय सेतुपती, अनुसया भारद्वाज, प्रियामणी, जगपती बाबू, प्रकाश राज आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. वायनाड पुनर्वसनासाठी 'पुष्पराज' आला पुढं, केरळ सरकारला दिली लाखो रुपयांची मदत - Kerala CM Relief Fund
  2. सुकुमारनं रामोजी फिल्म सिटीमध्ये पुन्हा सुरू केलं 'पुष्पा 2' चं शूटिंग, जाणून घ्या अल्लू अर्जुन कधी होणार सामील - Pushpa 2 Update
  3. 'पुष्पा 2' मुळं इतर सिनेमांचं रिलीज शेड्यूल फिसकटलं, 'पुष्पा'ची होणार 'छावा'शी टक्कर, रश्मिका मंदान्नाच्याही टेन्शनमध्ये वाढ - Pushpa 2 Vs Chhava

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.