मुंबई - Alibaba Ani Chaaleesheetale Chor : 'अलीबाबा आणि चाळीस चोर' ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 29 मार्चला चित्रपटगृहात ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर कलाकार एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे धमाकेदार पॅकेज असणार आहे.
‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ होणार लककरच प्रदर्शित : नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’चं दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलंय. या चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केलं असून नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते हे आहेत. चित्रपटाचे नाव ऐकूणचं अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
चाळीशीतील चोरांची टोळी : विवाहित असण्याचा गुन्हा चित्रपटातील या चाळीशीतील चोरांनी केला आहे. त्यामुळे विवाहित असणे गुन्हा आहे का ? आणि हे नेमके काय प्रकरण आहे, याचे उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. एकंदरच चित्रपटाच्या पहिल्या लूकवरून चोरांची ही टोळी दंगा करणार, हे निश्चित! चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, '' विवाहीत असण्याचा गुन्हा या चाळीशीतील चोरांनी केला आहे. आता या गुन्ह्याची त्यांना काय शिक्षा मिळणार, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट विनोदी आहे. सगळेच कलाकार मातब्बर असल्यानं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.’’ हा चित्रपट प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन करणार असं चित्रपटाच्या पोस्टरवरून दिसत आहे.
हेही वाचा :