ETV Bharat / entertainment

आलिया भट्टनं ब्लॅक वेल्वेट साडीत केलं चाहत्यांना घायाळ, 'पोचर' लंडन स्क्रीनिंगमधील फॅशन चर्चेत - पोचर वेब सीरीज

Poacher London Screening : आलिया भट्ट काळ्या मखमली साडीत 'पोचर' लंडन स्क्रीनिंगमध्ये सहभागी झाली. या महिन्याच्या अखेरीस अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'पोचर' वेब सीरीज प्रदर्शित होणार आहे.

Poacher London Screening
'पोचर' लंडन स्क्रीनिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 3:39 PM IST

मुंबई - Poacher London Screening : आजकाल आलिया भट्ट तिच्या अभिनयाबरोबर फॅशन सेन्समुळे चर्तेत असते. अवॉर्ड शो आणि प्रमोशनल इव्हेंटमध्ये आलिया सुंदर पोशाख परिधान करून तिच्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. आता आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती खूप आकर्षक दिसत आहे. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, 'पोचर' या वेब सीरीजच्या स्क्रिनिंगसाठी लंडनला पोहोचलेल्यानंतर आलिया काळ्या साडीत होती. डिझायनर सब्यसाचीच्या कलेक्शनमधून घेतलेली ब्लॅक वेलवेट फॅब्रिक सोनेरी गोंडस बॉर्डर असल्यानं ही साडी रॉयल दिसत होती. आलियानं या साडीवर सुंदर स्लीव्हलेस ब्लाउज घातलं होतं.

आलिया भट्टचा रॉयल लुक : आलिया भट्टनं या साडीवर मोत्याचा हार आकर्षक घातला होता. तिनं केसं बनमध्ये बांधले होते. चमकदार लाल लिपस्टिक आणि कमीतकमी डोळ्यांच्या मेकअपसह तिनं तिचा लूक परिपूर्ण केला होता. आलियाचे साडीतील फोटो समोर आल्यानंतर चाहते तिचं कौतुक करत आहेत. या कार्यक्रमात तिच्यासोबत तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टदेखील होती. आलियानं या कार्यक्रमामधील काही सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिच्या फोटोवर तिच्या एका चाहत्यानं लिहिलं, ''आलिया मी तुझा खूप मोठा चाहता आहे. तुझे फोटो खूप सुंदर असतात. याशिवाय दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''तू बॉलिवूडची राणी आहे.'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, ''कुठल्याही ड्रेसमध्ये आलिया खूप सुंदर दिसते.'' अशा अनेक कमेंट्स तिच्या पोस्टवर चाहते करत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहोत.

  • 'पोचर' वेब सीरीज : आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते रिची मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पोचर'मध्ये निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्या भूमिका आहेत. या वेब सीरीजची कहाणी हत्तींच्या शिकारीवर आधारित आहे. 23 फेब्रुवारी रोजी 'पोचर' अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
Poacher London Screening
'पोचर' लंडन स्क्रीनिंग

आलिया भट्टचं काय आहे वर्कफ्रंट : आलिया आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटामध्ये रणवीर सिंगबरोबर दिसली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. हा चित्रपट गाजला होता. आता पुढं ती 'जिगरा' चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'लव्ह अ‍ॅन्ड वॉर', 'सुपर एजंट', 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' आणि 'ब्रह्मास्त्र पार्ट 3'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्रा निक जोनासची मुलगी मालती मेरीचा बॉल पिटमध्ये खेळतानाचा फोटो व्हायरल
  2. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नासाठी पोहोचले गोव्यात; विमानतळावरील व्हिडिओ झाला व्हायरल
  3. हिना खान आणि मुनावर फारुकी स्टारर 'हल्की-हल्की सी' गाण्याच्या टीझर रिलीजची तारीख जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.