ETV Bharat / entertainment

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं नीतू कपूर आणि सोनी राजदानबरोबर मदर्स डे केला साजरा - Alia Bhatt Ranbir Kapoor - ALIA BHATT RANBIR KAPOOR

Ranbir Kapoor and Alia Bhatt : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत त्याच्याबरोबर त्याचे कुटुंब दिसत आहे.

Ranbir Kapoor and Alia Bhatt
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ((Ranbir Kapoor and Alia Bhatt - INSTAGRAM))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 11:28 AM IST

मुंबई - Ranbir Kapoor and Alia Bhatt : बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांमध्ये गणले जाणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. अलीकडेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह एकत्र दिसले. आलियानं 12 मे रोजी रात्री तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कुटुंबातील काही सदस्य दिसत आहेत. या फोटोत दोनच सदस्य बेपत्ता आहेत. आलिया भट्टच्या या खास पोस्टमागे एक खास कारण आहे. मदर्स डेच्या निमित्तानं तिनं हा फोटो पोस्ट केला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनीही त्यांच्या आईसाठी खास सेलिब्रेशन केलंय.

आलिया भट्टनं कुटुंबाबरोबर शेअर केला फोटो: व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि तिची आई सोनी राजदान तिच्याबरोबर दिसत आहेत. याशिवाय रणबीर कपूरची आई नीतू कपूरही या फोटोत आहेत. संपूर्ण कुटुंब एकत्र आहे आणि सर्वांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. हे सर्वजण बाल्कनीत पसरलेल्या गादीवर बसून फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. फोटोत नीतू कपूरनं पांढऱ्या रंगाची छत्री धरली आहे. हा फोटो पोस्ट करत आलिया भट्टनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझ्या मौल्यवान लोकांबरोबर अनमोल क्षण. मदर्स डेच्या शुभेच्छा." हा फोटो पाहिल्यानंतर आता आलियाचे चाहते या फोटोवर कमेंट्स करून तिला मदर्स डेच्या शुभेच्छा देत आहेत.

कुटुंबातील दोन सदस्य बेपत्ता : या फोटोत कुटुंबातील दोन सदस्य कुठे असल्याचं आता अनेकजण आलियाला विचारत आहेत. अनेकजण क्यूट राहा कपूर आणि तिचे आजोबा महेश भट्ट यांच्याबद्दल प्रश्न करत आहेत .आलिया भट्ट नुकतीच मेट गालाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर दुसऱ्यांदा फॅशनची जादू पसरवताना दिसली. यावेळी आलिया भट्टनं फ्लोरल मिंट कलरची साडी कॅरी केली होती. तिचा लूक अनेकांना आवडला होता.आलियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'जिगरा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर वेदांग रैना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आलियानं या चित्रपटाची निर्मिती करण जोहरबरोबर केली आहे.

हेही वाचा :

  1. विकी कौशल सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - Zara Hatke Zara Bachke
  2. 'मदर्स डे'निमित्त बॉलिवूड चित्रपटामधील आईवरचे प्रसिद्ध डायलॉग; पाहा फोटो - Happy mothers day
  3. मदर्स डेनिमित्त बॉलिवूड ते साऊथमधील 'या' सेलिब्रिटींनी त्यांच्या आईवर केला प्रेमाचा वर्षाव - Mothers Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.