ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' टायटल ट्रॅकचा टीझर रिलीज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 6:06 PM IST

Bade Miyan Chote Miyan Title Track: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टायटल ट्रॅकचा टीझर रिलीज झाला आहे. उद्या म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी सिनेमातील गाणं प्रदर्शित होणार आहे.

Bade Miyan Chote Miyan Title Track
बडे मियाँ छोटे मियाँ टायटल ट्रॅक

मुंबई - Bade Miyan Chote Miyan Title Track: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या दोघांची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या टायटल ट्रॅकचा टीझर समोर आला आहे. काही मिनिटांतच या टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्यात टायगर आणि अक्षय दमदार स्टाईलमध्ये दिसत आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील गाण्याची झलक पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. गाण्याचा टीझर शेअर करताना अक्षय आणि टायगरनं सोशल मीडियावर लिहिलं की, "बिग बँगच्या एक दिवस आधी, एक छोटा टीझर. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टायटल ट्रॅक उद्या रिलीज होत आहे."

टायटल ट्रॅक : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोन्ही स्टार्स त्यांच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहेत. या गाण्याच्या टीझरमध्येही दोघेही नव्या लूकमध्ये दिसत आहेत. टीझरमध्ये अक्षय आणि टायगरची जोडी बॉडी, गॉगल, गळ्यात चेन आणि अप्रतिम पोशाखांमध्ये छान दिसत आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टायटल ट्रॅक 19 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. अक्षय आणि टायगरचं येणाऱ्या गाण्याला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टायटल ट्रॅक अनिरुद्ध रविचंदर आणि विशाल मिश्रा यांनी गायला आहे. या चित्रपटामध्ये या जोडीची जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला प्रेक्षकांना मिळेल.

बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाबद्दल : 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा टायटल ट्रॅकच्या टीझरमध्ये सुरुवातीला टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारच्या पात्रांच्या झलक दाखविण्यात आली आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सैनिकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, आलिया एफ आणि रोनित रॉय यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित ॲक्शन एंटरटेनर ईदच्या मुहूर्तावर 9 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय आणि टायगरची जोडी पहिल्यांदच एकत्र दिसली आहे.

हेही वाचा :

  1. संजय कपूरची मुलगी शनाया कपूर चर्चेत, कारण काय?
  2. रश्मिका मंदान्ना थोडक्यात बचावली; उड्डाणानंतर फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड अन् इमर्जन्सी लँडिंग
  3. प्रियांका चोप्रा निक जोनासची मुलगी मालती मेरीचा बॉल पिटमध्ये खेळतानाचा फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.