मुंबई : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारने 2025 मध्ये आपल्या चित्रपटांसह धमाका करण्याची तयारी केली आहे. त्याचा हा आगामी चित्रपट होळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये झळकणार आहे. दरम्यान 'धर्मा प्रॉडक्शन'नं एक पोस्टर शेअर केलं आहे, यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'एक अनटोल्ड स्टोरी, अनटोल्ड ट्रूथ. अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांचा चित्रपट 14 मार्च 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. करण सिंग त्यागी दिग्दर्शित' या चित्रपटाचं शीर्षक अद्याप जाहीर झालेलं नाही. अक्षयचा हा चित्रपट ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यावर आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेवर आधारित असल्याचं बोललं जात आहे.
अक्षय कुमारचा आगामी चित्रपट सी. शंकरन नायर यांची बायोपिक : हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित असणार आहे. सी. शंकरन नायर यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध दिलेल्या लढ्याची कहाणी यात दाखवण्यात येईल. करण सिंग त्यागी दिग्दर्शित, हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मित केला जात आहे. सध्या निर्माता करण जोहर या चित्रपटावर खूप मेहनत घेत आहे. याशिवाय अक्षयचे चाहते, या चित्रपटाची खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. अक्षयच्या आगामी चित्रपटाची घोषणा होताच नेटिझन्सनी कमेंट सेक्शनमध्ये भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, 'अक्षय आणि आर माधवनचा ब्लॉकबस्टर चित्रपट.' दुसऱ्या एकानं लिहिलं,'मी अक्षय सरांच्या पुनरागमनाची वाट पाहत आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'खूप सुंदर आता हा चित्रपट मी नक्कीच पाहणार आहे.'
अक्षय कुमारचं वर्क फ्रंट : अक्षयचा शेवटचा रिलीज 'खेल खेल' हा चित्रपट होता, जो 15 ऑगस्टला रिलीज झाला. मात्र हा चित्रपट काही विशेष कामगिरी बॉक्स ऑफिसवर करू शकला नाही. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, अक्षयकडे 'भूत बंगला',' हाउसफुल 5', 'जॉली एलएलबी 3', 'स्कायफोर्स' सारखे चित्रपट आहेत. त्याचे हे चित्रपट 2025 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आता अक्षय कुमार एका हिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत.
हेही वाचा :
- अक्षय कुमार स्टारर 'सरफिरा'ची ओटीटी रिलीजची तारीख ठरली, डिस्ने + हॉटस्टारवर होणार प्रवाहित - Sarafira OTT release
- अक्षय कुमार स्टारर 'भूत बंगला'मध्ये 'हे' 3 स्टार्स करेल एन्ट्री, 'ब्लॉकबस्टर'ची प्रतीक्षा संपणार? - Akshay kumar
- अक्षय कुमारचे आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होईल?, जाणून घ्या तारीख... - akshay kumar