ETV Bharat / entertainment

अजय देवगण स्टारर 'शैतान'नं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केलं उत्तम कलेक्शन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 12:51 PM IST

Shaitaan advance booking: अभिनेता अजय देवगणचा 'शैतान' चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'शैतान' चित्रपटानं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित आहे.

Shaitaan advance booking
शैतान ॲडव्हान्स बुकिंग

मुंबई - Shaitaan advance booking: अभिनेता अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका स्टारर 'शैतान' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकजण 'शैतान'ची वाट पाहू लागले. आता अखेर हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 'शैतान' चित्रपटाचं बुकिंग 4 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 'शैतान'नं रिलीजपूर्वी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट असणार आहे. आर माधवन या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसत असून अजय हा आपल्या कुटुंबाचं रक्षण करताना दिसेल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'शैतान' ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन : 'शैतान'चे ॲडव्हान्स बुकिंग दोन दिवसांपूर्वी सुरू झाले असून सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार आतापर्यत या चित्रपटाची 46966 तिकिटे विकली गेली आहे. या चित्रपटानं आता जवळपास 1.12 कोटीची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. रिलीजची तारीख जसजशी जवळ येईल तसतसा हा आकडा नक्कीच वाढेल. हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. 'शैतान' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करेल असा अंदाज आता वर्तवला जात आहे. 'शैतान' चित्रपट 60 कोटी ते 65 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला आहे. 'शैतान'चा ट्रेलर हा खूप थरारक होता, त्यामुळे या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.

'शैतान' चित्रपटाबद्दल : विकास बहल दिग्दर्शित 'शैतान'ची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहेत. याशिवाय यावर्षी अजयचे आणखी 5 मोठे चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. ज्यामध्ये 'शैतान', 'औरों में कहाँ दम था' ,मैदान', 'सिंघम अगेन' आणि 'रेड 2' या चित्रपटाचा समावेश आहे. बघितलं तर अजय देवगण या वर्षभर चित्रपटगृहांवर अधिराज्य गाजवणार आहे. अजय देवगणच्या या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे आर माधवनकडे 'टेस्ट', 'अधिष्ठासली' आणि 'जीडी नायडू बायोपिक' देखील पाइपलाइनमध्ये आहेत.

हेही वाचा :

  1. पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लग्नपत्रिका लीक
  2. 'मडगाव एक्सप्रेस'मधून दिग्दर्शनात पदार्पण कसे झाले याचा कुणाल खेमूने केला खुलासा
  3. प्रतीक गांधी दिव्येंदू अविनाश तिवारी स्टारर 'मडगाव एक्सप्रेस' ट्रेलर प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.