ETV Bharat / entertainment

निवडणूक जिंकल्यानंतर पवन कल्याणचं कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, चिरंजीवीच्या पायावर झाला नतमस्तक - Pawan Kalyan

Pawan Kalyan : आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसमबरोबरच्या युतीच्या विजयानंतर पवन कल्याणनं दिल्लीत एनडीए आघाडीच्या बैठकीत भाग घेतला. आता तो हैदराबादला परतला असून चिरंजीवीच्या घरी त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी तो मोठा भाऊ असलेल्या चिंरजीवीच्या पायावर नतमस्तक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Pawan Kalyan's warm welcome to Chiranjeevi's family
पवन कल्याणचं कुटुंबीयांकडून जंगी स्वागत (Chiranjeevi Konidela X)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 9:42 AM IST

हैदराबाद : Pawan Kalyan : जनसेना नेते पवन कल्याण यानं त्याचा वडिल बंधू आणि अभिनेता चिरंजीवी याची भेट घेतली. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या आघाडीच्या विजयानंतर त्यानं काल दिल्लीत एनडीए आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर तो हैदराबादला परतला आहे. येथे पोहोचल्यानंतर पवन कल्याण भाऊ चिरंजीवीच्या घरी भेटीसाठी आला. यावेळी चिरंजीवीच्या मेगा कुटुंबानं त्याचं जोरदार स्वागत केलं.

पवन कल्याणचं जंगी स्वागत

हैदराबादला परतताच चिरंजीवींच्या घरी पवन कल्याणच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती. गाडीतून उतरताच पवन कल्याण आपल्या कुटुंबीयांची गळाभेट घेताना दिसला. त्याच्या बरोबर त्याची पत्नी लेझिनोवा आणि त्यांचा मुलगा अकिरा होते. या सर्वांचं पवन कल्याण आणि चिरंजीवीची आई अंजनादेवी यांनी जोरदार स्वागत केलं. त्याच्या स्वागतासाठी उभा असलेल्या चिरंजीवीला पाहून त्यानं आपलं बंधू प्रेम व्यक्त केलं. त्यानं चिरंजीवीच्या पायवर आपलं डोकं ठेवून त्याला नमन केलं आणि आशीर्वाद घेतला. दोन भावांची ही अनोखी भेट त्यांची आई आणि कुटुंबीय भारवून पाहात होते. त्यानंतर चिरंजीवी, रामचरण, पवन कल्याण यांनी कुटुंबाबरोबर फोटो काढले.

पवन कल्याणचा प्रचंड मतांनी विजयी

आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत जेएसपी नेते आणि साऊथ सुपरस्टार पवन कल्याण यानं पिठापुरम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यानं वायएसआरकाँग्रेसचे उमेदवार वंगा गीता विश्वनाथ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. आंध्र प्रदेशमध्ये पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने भाजपबरोबर युती करून निवडणूक लढवली आणि राज्यातील २१ जागांवर आपले उमेदवार विजयी केले. त्याच्या पक्षाचे दोन खासदारही संसदेत पाठवण्यात पवन कल्याणला यश आलंय.

हेही वाचा -

  1. कंगणा राणावतच्या मारली कानाखाली : जाणून घ्या कोण आहे महिला जवान कुलविंदर कौर - Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut
  2. 'हमारे बारह' चित्रपटावरील स्थगिती उठवली; मात्र तीन सदस्यीय समितीला चित्रपट पाहण्याचे न्यायालयाचे आदेश - mumbai high court
  3. विमानतळावर CISF महिला जवानानं का फोडलं कंगना रणौतचं थोबाड? - Kangana Ranaut slapped

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.