ETV Bharat / entertainment

आफताब शिवदासानीची 'वेलकम टू जंगल'मध्ये एंट्री, अक्षय कुमारबरोबरचे फोटो केले शेअर - aftab shivdasani - AFTAB SHIVDASANI

Aftab Shivdasani : आफताब शिवदासानी हा 'वेलकम टू जंगल' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानं सोशल मीडियावर अक्षय कुमारबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.

Aftab Shivdasani
आफताब शिवदासानी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 1:07 PM IST

मुंबई - Aftab Shivdasani : अभिनेता आफताब शिवदासानीचा कॉमेडी चित्रपट 'वेलकम टू जंगल'मध्ये एंट्री झाली आहे. त्यानं शूटिंग क्लॅप बोर्ड आणि चित्रपटाचा मुख्य अभिनेता अक्षय कुमारबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. आफताब आणि अक्षय कुमार 16 वर्षांनंतर एकत्र चित्रपट करणार आहेत. याआधी ही जोडी 'आवारा पागल दिवाना' चित्रपटात एकत्र दिसली होती. आता आफताब हा 'वेलकम टू द जंगल 'चा भाग असणार आहे. आफताबनं शेअर केलेले फोटो खूप मजेदार आहेत. 16 वर्षांनंतर दोन्ही स्टार्सच्या चेहऱ्यात काहीही बदल झालेले नाही.

'वेलकम टू द जंगल' चित्रपटात आफताबची एंट्री : आफताबनं ही आनंदाची बातमी शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं, "इस 'दीवाना' का इस 'पागल' जंगल में 'स्वागत' करने के लिए 'आवारा' को धन्यवाद." या चित्रपटाची घोषणा सप्टेंबर 2023 मध्ये झाली होती. यानंतर चित्रपटाचं शीर्षक 'वेलकम टू द जंगल' ठेवण्यात आलं होतं. 'वेलकम टू द जंगल' चित्रपटामध्ये जवळपास 25 कलाकार आहेत. आता हे स्टार्स प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करताना दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये अक्षयबरोबर त्याची एक्स गर्लफ्रेंड रवीना टंडन देखील दिसणार आहे.'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहे. या चित्रपटाची निर्मिती जिओ प्लॅटफॉर्म्स कंपनी करत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चित्रपटाची स्टार कास्ट : या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, इनामूलहक्क, कृष्णा अभिषेक, झाकीर हुसैन, यशपाल शर्मा, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी आणि वृही कोडवारा हे स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो, 'खेल खेल में', 'सरफिरा', 'स्काई फोर्स', 'सिंघम अगेन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्रानं जोनास, मुलगी मालती मेरीसह घेतला सुट्टीचा आनंद, शेअर सुंदर झलक - Priyanka Chopra
  2. ज्युनियर एनटीआर मुंबईत! हृतिक - सबा, रणबीर - आलिया बरोबर केली डिनर डेट - Ranbir Alia to Jr NTR Dinner Date
  3. मतदान संपताच मुंबईला आल्यानं अरुण गोविल टीकेची धनी, सारवासारव करत म्हणाले... - Arun Govil

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.