ETV Bharat / entertainment

अनन्या पांडेबरोबरच्या ब्रेकअपच्या अफवांनंतर आदित्य रॉय कपूर 'या' अभिनेत्रीसोबत झाला स्पॉट - ADITYA ROY KAPUR BREAKUP RUMORS - ADITYA ROY KAPUR BREAKUP RUMORS

Aditya Roy kapur Sara ali khan : अनन्या पांडेबरोबरच्या ब्रेकअपच्या अफवांनंतर आदित्य रॉय कपूर हा सारा अली खानबरोबर एक पार्टीमध्ये स्पॉट झाला. आता त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Aditya Roy kapur Sara ali khan
आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 3:41 PM IST

मुंबई - Aditya Roy kapur Sara ali khan : बॉलिवूडमधून ब्रेकअप-पॅचअपच्या अफवा रोज समोर येतात. कधी या अफवा खऱ्या असतात तर कधी खोट्या ठरतात. अलीकडेच अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या होत्या. दोन्ही स्टार्सनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. आता एकीकडे ब्रेकअपच्या अफवा सुरू आहे, तर दुसरीकडे आदित्य रॉय कपूर सारा अली खानबरोबर स्पॉट झाला आहे. सारा आणि आदित्यमध्ये जवळीकता वाढल्याचं बोललं जात आहे. दोघेही एका खास प्रसंगी एकत्र दिसले आहेत. आता दोघांमध्ये नेमक काय सुरू आहे, याबद्दल जाणून घेऊया.

सारा आणि आदित्य दिसणार 'या' चित्रपटात एकत्र : दिग्दर्शक अनुराग बसूच्या वाढदिवसाला आदित्य रॉय कपूर सारा अली खान यांनी हजेरी लावली होती. हे दोघेही दिग्दर्शक अनुराग बसूच्या 'मेट्रो... इन दिनों' या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. अनुराग बसू यांचा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक कलाकार उपस्थित होते. आता या पार्टीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अनुराग बसू आपल्या पाहुण्यांना वाढदिवसाचा केक खाऊ घालताना दिसत आहे. ते प्रत्येकाकडे जाऊन त्यांना केक देत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूरचा व्हिडिओ व्हायरल : दरम्यान व्हिडिओत सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूरही एकत्र उभे असल्याचं दिसत आहे. याशिवाय अनुराग आणि आदित्य हातवारे करून बोलताना दिसत आहेत. आता सारा आणि आदित्यला एकत्र पाहिल्यानंतर काहीजण त्याचं नाव जोडताना दिसत आहेत. तर अनेकजण हे दोघे फक्त को-स्टार आहेत असं म्हणत आहे. तसेच काहीजण आदित्य हा अनन्या पांडेला चिट करत असल्याचं देखील म्हणत आहेत. आता सारा आणि आदित्यचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 'मेट्रो... इन दिनों' चित्रपट 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या 'लाइफ इन अ मेट्रो' या चित्रपटाचा सीक्वेल आहे. 'मेट्रो इन दिनों'मध्ये अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेनशर्मा, अली फजल आणि फातिमा सना शेख हे कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. विजय देवराकोंडाच्या वाढदिवसानिमित्त 'राउडी जनार्दन'ची घोषणा, पोस्टर रिलीज - Vijay Deverakonda Birthday
  2. सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी आरोपी रफिक चौधरीने आणखी दोन स्टारच्या घरांची केली होती पाहणी - Salman Khan house firing case
  3. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा व्हिडिओ व्हायरल, कॅमेरा बघताच केलं 'हे' कृत्य - Deepika Padukone and Ranveer Singh

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.