ETV Bharat / entertainment

'सर्व ठीक चालले आहे', 'द साबरमती रिपोर्ट' रिलीज होण्यापूर्वी विक्रांत मॅसीच्या वक्तव्यानं सोशल मीडिया पेटले - VIKRANT MASSEY

'ट्वेल्थ फेल' अभिनेता विक्रांत मॅसीनं आता एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्याला यासाठी सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

vikrant massey
विक्रांत मॅसी (vikrant massey (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 11, 2024, 3:03 PM IST

मुंबई : 'ट्वेल्थ फेल' अभिनेता विक्रांत मॅसी सध्या त्याच्या आगामी 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'द साबरमती रिपोर्ट' 15 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. याआधी या चित्रपटातील मुख्य अभिनेता विक्रांतनं एक मोठे वक्तव्य केलंय. 'साबरमती रिपोर्ट' हा 2002च्या गोध्रा घटनेवर आधारित चित्रपट आहे, ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिमचा मोठा वाद झाला होता. आता विक्रांतनं मुस्लीम समाजाबाबत असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे. नुकत्याच एका मुलाखतीत विक्रांतनं म्हटलं," ज्या गोष्टी मला निरुपयोगी वाटत होत्या, माझ्या मते त्या खरोखर निरुपयोगी नाहीत. लोक म्हणतात, हिंदू आणि मुस्लिम धोक्यात आहेत. पण मला नाही वाटत."

विक्रांत मॅसीचं वादग्रस्त विधान : पुढं त्यानं म्हटलं, "मुस्लिम धोक्यात आहेत, कोणाला धोका नाही, सर्व काही ठीक चालले आहे, भारत जगातील सर्वोत्तम ठिकाण आहे, युरोप, फ्रान्स, अमेरिकेत जा तुम्हाला कळेल तिथे काय चालले आहे. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे, जिथे शांततेनं सर्व राहतात, भारत हे जगाचे भविष्य आहे. इथे डावी आणि उजवी विचारसरणी नाही. मला डावी विचारसरणी दिसत नाही. आपला वैयक्तिक अनुभव सांगताना, विक्रांतनं म्हटलं, माझे सासरे हिमाचलमधील एका लहान गावात राहतात, जिथून राष्ट्रीय महामार्ग 4 तासांच्या अंतरावर आहे, परंतु मी पाहतो की आता परिस्थिती बदलत आहे, होय, मी एक सन्माननीय स्टार आहे, भारत सरकारकडून मलाही शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, माझा चित्रपट सरकारी शाळेत दाखवले गेले होते, मी त्यांना ते दाखवायला सांगितले नव्हते, पण त्यांनी माझा चित्रपट शाळेतील मुलांना दाखवला, 'ट्वेल्थ फेल', यामुळे मी खूप आनंदी आहे'.

विक्रांत मॅसी ट्रोल झाला : आता विक्रांत मॅसीला त्याच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. एका यूजरनं याच्याबद्दल लिहिलं आहे की, 'सोशल मीडियावर राजकीय विचारधारेचे पालन करण्याचा दावा करणाऱ्या लोकांप्रमाणे तू एक संधीसाधू अभिनेता आहे.' आणखी एका यूजरनं लिहिलं आहे की, 'मी खात्रीनं सांगू शकतो की, त्याचा नवीन चित्रपट नक्कीच येणार आहे.' दरम्यान त्याच्या आगामी 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री राशी खन्ना दिसणार आहे. पहिल्यांच राशी आणि विक्रांत रुपेरी एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत.

हेही वाचा :

  1. विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना स्टारर 'द साबरमती रिपोर्ट'चा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ...
  2. 'फिर आयी हसीन दिलरुबा'च्या रिलीजपूर्वी तापसी पन्नूनं दिली 'हसीन दिलरुबा 3'ची हिंट - Haseen Dillruba
  3. विक्रांत मॅसी आणि रघु राम यांचा सेटवरील भांडणाचा व्हिडिओ व्हायरल - Vikrant Massey

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.