ETV Bharat / entertainment

संजय कपूरची मुलगी शनाया कपूर चर्चेत, कारण काय? - शनाया कपूरचा रॅम्प वॉक

Shanaya Kapoor : अभिनेता अनिल कपूरचा धाकटा भाऊ संजय कपूरची मुलगी शनाया कपूरनं मुंबईतील एका इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक केला. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shanaya Kapoor
शनाया कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 4:28 PM IST

मुंबई - Shanaya Kapoor : अनिल कपूरचा धाकटा भाऊ संजय कपूरची मुलगी शनाया कपूरनं अद्याप हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले नाही. असे असले ती अनेकदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. शनाया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आता अलीकडेच ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा रॅम्प वॉक आहे. मुंबईतील एका इव्हेंटमध्ये शनाया सहभागी झाली होती. या कार्यक्रमामध्ये रॅम्प वॉक करताना अनेकांच्या नजरा शनायावर खिळल्या होत्या.

शनाया कपूरचा रॅम्प वॉक : या कार्यक्रमात शनायानं मिरर लेहेंगा परिधान केला होता. मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअपमध्ये ती खूप अप्रतिम दिसत होती. आता तिचे काही सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण शनायाचे कौतुक करत आहेत. शनायानं वॉकदरम्यान आकर्षक पोझ दिल्या. यावेळी शनायाच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वासही दिसला. आता तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, '' शनाया बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार आहे. तिचा लूक हा जबरदस्त आहे.'' आणखी दुसऱ्यानं लिहिलं, ''खूप हॉट दिसत आहे.'' आणखी एकानं लिहिलं, शनायाचा रॅम्प वॉक खूप सुंदर केलं आहे.'' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

शनाया कपूर बद्दल : महीप कपूर आणि संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर तिच्या पदार्पणापासूनच बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. शनाया कपूरलाही हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी अभिनेत्री बनायचे आहे. शनाया फक्त 24 वर्षांची आहे. तिनं इंडस्ट्रीत पहिलं पाऊल टाकलं आहे. शनाया मोहनलाल सोबत साऊथ चित्रपट 'वृषभ'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहे. याशिवाय धर्मा प्रॉडक्शन निर्मित 'बेधडक' या प्रोजेक्टमध्ये ती लक्ष्य ललवाणीसोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. रश्मिका मंदान्ना थोडक्यात बचावली; उड्डाणानंतर फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड अन् इमर्जन्सी लँडिंग
  2. प्रियांका चोप्रा निक जोनासची मुलगी मालती मेरीचा बॉल पिटमध्ये खेळतानाचा फोटो व्हायरल
  3. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नासाठी पोहोचले गोव्यात; विमानतळावरील व्हिडिओ झाला व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.