ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यन प्रेमात पडायला तयार, नेहा धुपियाला दिली मोठी जबाबदारी - kartik ready for love relationship - KARTIK READY FOR LOVE RELATIONSHIP

Kartik aaryan : कार्तिक आर्यन हा आता प्रेमात पडायला तयार झाला आहे. त्यानं 'नो फिल्टर नेहा' शोदरम्यान नेहा धुपियाला त्याच्यासाठी मुलगी शोधण्यास सांगितलं आहे.

Kartik aaryan
कार्तिक आर्यन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 10:36 AM IST

मुंबई - Kartik aaryan : अभिनेता कार्तिक आर्यनचे अनेक चाहते आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच तो सुंदर लूकनेही अनेकांचे मने जिंकत असतो. कार्तिकचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहेत. आता पुन्हा एकदा त्याच्या डेटींगसंबंधित एक अपडेट समोर आली आहे. कार्तिक हा फार काळ कोणाला डेट करत नाही, तो प्रेमपासून दूर राहतो. आता अलीकडेच तो रिलेशनशिपबद्दल बोलला आहे. त्यानं जाहीर केलं आहे की, तो आता आपल्या आयुष्यात कोणाला तरी खास स्थान देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यानं मुलगी शोधण्याची जबाबदारी बी-टाउनमधील सुंदर अभिनेत्री नेहा धुपियाला सोपवली आहे.

कार्तिक आर्यन प्रेमात पडायला तयार : 'नो फिल्टर नेहा' शोच्या फिनाले एपिसोडमध्ये कार्तिक आर्यन गेस्ट म्हणून आला होता. 'नो फिल्टर नेहा सीझन 6' च्या एका मजेदार सेगमेंटमध्ये नेहानं कार्तिकला विचारले की तो सिंगल आहे का? रिलेशनशिपसाठी तयार आहे का? यावर त्यानं म्हटलं, ''सध्या मी पूर्णपणं सिंगल आहे. खूप दिवस झाले. मी कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये नव्हतो. हे थोडं क्लिच उत्तर आहे. पण खरं तर मी माझ्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटावर लक्ष केंद्रित करत होतो. त्यानंतर त्यानं पुढं सांगितलं, ''बरेच वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिरल्यानंतर आता मला प्रेमासाठी वेळ मिळाला आहे. नेहा तू माझ्यासाठी कोणीतरी शोध.''

नेहाकडे जबाबदारी दिली : यानंतर त्यान पुढं म्हटलं, '' माझ्याकडे वेळ नव्हता, सर्वकाही खूप नीरस होते. मी रोबोटिक जीवनशैली जगत होतो. मात्र आता माझ्याकडे प्रेम करण्यासाठी वेळ आहे.'' यानंतर नेहा धुपियादेखील दिलेली जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना दिसते. कार्तिक दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिकबरोबर तृप्ती दिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. कार्तिक शेवटी 'सत्यप्रेम की कथा' कियारा अडवाणीबरोबर दिसला होता. तसेच तो 'भूल भुलैया 3' व्यतिरिक्त कबीर खान यांच्या 'चंदू चॅम्पियन'मध्ये कतरिना कैफबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकीवर फेकली अंडी; पोलिसांनी आरोपीला बजावली नोटीस - Munawar Faruqui
  2. हावडा ब्रिजवर 'रूह बाबा'च्या अवतारात दिसला कार्तिक आर्यन - kartik aryan shares picture
  3. पवित्रा पुनियाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर एजाज खाननं रिलेशनशिपबद्दल केला खुलासा - Pavitra and Ejaz relationship

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.