हैदराबाद : पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुन याला चेंगराचेंगरी प्रकरणात अटक केल्यानंतर त्याला रात्रभर कारागृहात राहावं लागलं. मात्र आज सकाळी अल्लू अर्जुन याची सुटका झाल्यानंतर या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल अल्लू अर्जुन यानं त्यांचे आभार मानले. मात्र त्यानंतर पीडित महिलेच्या पतीनं अल्लू अर्जुन याच्याविरोधातील तक्रार मागे घेतली. त्यामुळे रात्रभर कारागृहात राहावं लागलेल्या अल्लू अर्जुनसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
#WATCH | Telangana: Actor Allu Arjun arrives at his residence at Jubilee Hills in Hyderabad
— ANI (@ANI) December 14, 2024
He was released from Chanchalguda Central Jail today after Telangana High Court granted him interim bail yesterday on a personal bond of Rs 50,000 in connection with the death of a woman… pic.twitter.com/auX0ldEqsv
अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला दुर्दैवी घटना : पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या चंचलगुडा चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन याला रात्रभर कारागृहात ठेवण्यात आलं. आज सकाळी बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन यानं माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी अल्लू अर्जुन यानं चाहत्यांचे आभारही मानले. आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपणा सर्वांचे आभार, काळजी करण्यासारखं काही नाही. मी ठिक आहे. मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. त्यामुळे मी पोलिसांना शक्य तेव्हढं सहकार्य करीन. चंचलगुडा चेंगराचेंगरी ही दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांचं झालेलं नुकसान भरुन न येणारं आहे. या प्रकरणी मी पुन्हा शोक व्यक्त करतो, असं अल्लू अर्जुन यानं स्पष्ट केलं. यावेळी त्यानं त्याच्या चाहत्यांना हात जोडून अभिवादनही केलं.
#WATCH | Hyderabad, Telangana: Actor Allu Arjun says, " i thank everyone for the love and support. i want to thank all my fans. there is nothing to worry about. i am fine. i am a law-abiding citizen and will cooperate. i would like to once again express my condolences to the… https://t.co/wQaQsdicpu pic.twitter.com/nNE1xQTyo5
— ANI (@ANI) December 14, 2024
पीडितेच्या कुटुंबीयांनी घेतली तक्रार मागे : अल्लू अर्जुन याचा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असून मुलगा जखमी झाला. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रार दाखल केली होती. मात्र अल्लू अर्जुन याच्यावतीनं ही दुर्दैवी घटना घडल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पीडितेच्या झालेल्या हाणीबद्दल शोक व्यक्त करत 25 लाख रुपयाची मदतही पीडितेच्या नातेवाईकांना करण्याचं जाहीर करण्यात आलं. अल्लू अर्जुन याच्यावतीन पीडितेच्या कुटुंबाविषयी शोक संवेदना व्यक्त करण्यात आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांकडून अभिनेता अल्लू अर्जुन याच्याविषयी तक्रार नसल्याचं स्पष्ट करण्यात आल होतं. त्यानंतर अल्लू अर्जुन रात्रभर कारागृहात राहून आल्यानंतर सकाळी त्यानं पुन्हा माध्यमांसमोर पीडित कुटुंबीयांबाबत शोक व्यक्त केला. त्यानंतर या प्रकरणात मोठा उलटफेर घडून आला. पीडितेच्या पतीनं अल्लू अर्जुन याच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
Actor Allu Arjun says, " it was an unfortunate incident...i will be there for the family to support them in every possible way..." pic.twitter.com/Ab01nUYBpp
— ANI (@ANI) December 14, 2024
हेही वाचा :