मुंबई - 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' हे बॉलिवूडच्या दोन मोठ्या फ्रँचायझीचे चित्रपट या दिवाळीत एकत्र प्रदर्शित होणार आहेत. 'सिंघम अगेन' हा रोहित शेट्टीचा मल्टीस्टारर चित्रपट आहे. यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे, तर 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. हे दोन्ही चित्रपट 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. काही चित्रपटगृहांमध्ये दोन्ही चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. चला जाणून घेऊया दोन्ही चित्रपटांची प्रिसेल उत्पन्न किती आहे.
प्रीसेलमध्ये आघाडीवर कोणता चित्रपट आहे? - इंडस्ट्री ट्रॅकर सकनील्कच्या मते, 'सिंघम अगेन'च्या एक दिवस आधी 'भूल भुलैया 3' ची प्री-सेल तिकीट विक्री सुरू झाली होती. 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजेपर्यंत 34289 तिकिटे विकली गेली आहेत आणि एकूण 88.02 लाख रुपये कमावले आहेत. दरम्यान, 'सिंघम अगेन'चेही बुकिंग सुरू झाले असून, काही तासांतच 18.46 लाख रुपयांची 4901 तिकिटे विकली गेली आहेत. हे प्राथमिक आकडे ब्लॉक केलेल्या जागा आणि ट्रॅक केलेले शो दर्शवत आहेत.
दोन्ही चित्रपटांना किती स्क्रीन स्पेस मिळाली? - स्क्रीन स्पेसच्या लढाईत दोन चित्रपटांमध्ये मोठी स्पर्धा होती आणि परिणामी, प्रीसेल्स तिकीट विक्री नेहमीपेक्षा उशिराने सुरू झाली. 'सिंघम अगेन'ला सर्व ठिकाणी प्रदर्शित होणाऱ्या एकूण शोपैकी 56% शो मिळतील, तर 'भूल भुलैया 3' ला 46% मिळतील. हळूहळू यामध्ये वाढ होत जाईल.
'सिंघम अगेन' चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं असून अजय देवगणनं यात मुख्य भूमिका साकारली आहे. तर अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर यांसारखे कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'भूल भुलैया 3'मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असून, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, विजयराज यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.