मुंबई - गेल्या तीन दशकापासून शाहरुख, सलमान आणि आमिर हे तीन खान बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहेत. या काळात अनेक नव्या दमाच्या कालाकारांचा उदय झाला आणि काहीजण तर काळाच्या ओघात या स्पर्धेतून बादही झाले. अपवाद वगळता या तीन खानांनी आपले फिल्म इंडस्ट्रीतील स्थान आणखी मजबूत केले आहे. या दरम्यान, यश आणि अपयशाची चवही त्यांनी चाखली. पण या अशा संकटातून कसे सुखरुप बाहेर पडाचे याचा चांगलाच अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ही सर्वच मंडळी आता पन्नाशी पार केले आहेत. त्यामुळे नायक म्हणून मोठ्या पडद्यावर वावरताना काही मर्यादा त्यांनाही येऊ शकतात. त्यामुळे मल्टीस्टारर चित्रपटांच्या ट्रेंडला यश मिळत असल्यामुळे त्या दिशेनंही त्यांनी पाऊले उचलली आहेत. दरम्यान आमिर खानने नुकतेच स्वत: शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील आगामी चित्रपटाच्या शक्यतेचे संकेत दिले.
आमिर खानच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्राम लाइव्ह सेशनदरम्यान आमिरने खुलासा केला की, तिन्ही कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एका चित्रपटात एकत्र काम करण्याबाबत चर्चा केली आहे. आपण एकत्र काम केलं पाहिजे यावर त्यांचा विश्वास बसला आहे. शाहरुख आणि सलमान बरोबर स्क्रीन स्पेस शेअर करताना बघायला मिळेल का असा प्रश्न त्याला चाहत्यांनी विचारला असता, आमिरने या कल्पनेबद्दल उत्साह व्यक्त केला. तो म्हणाला की याबाबत आम्ही बोललो आहोत पण आता त्याची अंमलबजावणी करणयाची वेळ आली आहे.
आमिर या चर्चेत म्हणाला की, "जेव्हा मी, सलमान आणि शाहरुख एकत्र होतो तेव्हा आमच्या करियरबद्दल बोललो आहोत. आम्हा तिघांनाही एका चित्रपटात काम केले पाहिजे असे वाटते. आता हे पुढं कधी घडतंय पाहू. मला वाटतं की चांगली कथा असेल तर आम्ही ते करु. मला वाटतं की आम्हा तिघांनाही एकत्र काम करायची इच्छा आहे. आता हे घडलं पाहिजे. मला वाटतं की हीच ती योग्य वेळ आहे." असे लाइव्ह चॅट दरम्यान अभिनेता आमिर खान म्हणाला.
30 वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीचा भाग असूनही, या तिघांनी कधीही चित्रपटात एकत्र काम केले नाही. तथापि, आमिर आणि सलमानने राजकुमार संतोषी दिग्दर्शित कल्ट क्लासिक 'अंदाज अपना अपना' मध्ये एकत्र काम केले होते . याबद्दल बोलताना, आमिरने चॅट दरम्यान एक अपडेट शेअर केले, त्यात म्हटलंय की, संतोषी सध्या प्रिय कॉमेडीच्या सिक्वेलच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत.
1994 मध्ये रिलीज झालेला अंदाज अपना अपना, सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही पण कालांतराने याला लोकप्रियता मिळाली. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या विनोदी चित्रपटांपैकी एक असा हा चित्रपट बनला. आमिरने सिक्वेलबद्दल उत्सुकता व्यक्त केली आणि कबूल केले की ते अद्याप कथेचा विस्ताराचे काम सुरू आहे.
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंग चड्ढा' या शेवटच्या चित्रपटानंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. मात्र, तो 'सितारे जमीन पर' चित्रपटातून आता पुन्हा एक पुनरागमन करणार आहे. 2024 च्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होईल.
हेही वाचा -