ETV Bharat / entertainment

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर - singer Anuradha Paudwal

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 3:43 PM IST

Updated : Aug 13, 2024, 8:12 PM IST

Anuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय चित्रपट क्षेत्रात अमूल्य योगदानाबद्दल दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

Anuradha Paudwal
गायिका अनुराधा (Anuradha Paudwal - instagram)

मुंबई Anuradha Paudwal : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करत असते. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्कारानं गौरविण्यात येणार असून सर्व पुरस्कारार्थींचं मंत्री मुनगंटीवार यांनी अभिनंदन केलं आहे.

ईटीव्ही भारतला अनुराधा पौडवाल यांची Exclusive प्रतिक्रिया (Source- ETV Bharat)

अमूल्य योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर : संगीत आणि गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पण केलं आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा 2024 च्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार- 2024साठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव 2024चा पुरस्कार श्रीमती शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे. संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आलं आहे. संत साहित्यावर लेखन आणि संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल 2024चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे.

प्रत्येक वर्गवारीमध्ये एक पुरस्कार : तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार 2023साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली असून, 2024साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ मान्यवर कलाकारास या पुरस्कारानं गौरविण्यात येतं. सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2024ची घोषणा केली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटक या विभागासाठी 2024चा पुरस्कार विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये 2024चा पुरस्कार डॉ. विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारातील 2024चा पुरस्कार सुदेश भोसले यांना घोषित झाला आहे. लोककला क्षेत्रातील 2024चा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर यांना जाहीर झाला असून शाहीरी क्षेत्रातील 2024चा पुरस्कार, शाहीर राजेंद्र कांबळे यांना घोषित झाला आहे.

चित्रपट क्षेत्रासाठी रोहिणी हट्टंगडी यांना पुरस्कार : नृत्य वर्गवारीतील 2024साठी श्रीमती सोनिया परचुरे यांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रासाठी 2024चा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना घोषीत झाला आहे. तसंच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील 2024चा पुरस्कार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील 2024साठी पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात 2024साठी नागेश सुर्वे (ऋषीराज) यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील 2024चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास मारुती सावंत यांना घोषित झाला आहे तर आदिवासी गिरीजन वर्गवारीमध्ये 2024साठी शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली आहे.

ETV Bharat
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (ETV Bharat)

सुधीर मुनगंटीवार यांनी केलं अभिनंदन : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गतवर्षीपासून दुप्पट वाढ करण्यात आली असून, पूर्वी या पुरस्काराचं स्वरूप रोख रक्कम पाच लाख, मानपत्र आणि मानचिन्ह असं होतं. आता रुपये 10 लाख रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं देण्यात येईल. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचं अभिनंदन केलं आहे. पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून अजून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक क्षेत्राची सेवा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबत, सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहत असून, भविष्यातही कलाकारांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र अधिकाधिक संपन्न व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सदैव तत्पर असल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. आता लवकरच हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

कुठलाही पुरस्कार मिळाल्यानंतर बरं वाटतं. कलाकार म्हणून दाद मिळाल्यावर वेगळाच आनंद असतो. महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळाल्यानं आनंद वाटत आहे. विशेषत: जिथे काम करतो तिथे पुरस्कार मिळाल्यानं खूप आनंद वाटतो. - रोहिणी हट्टंगडी

सुरुवातीच्या चित्रपटात तरुणी ते महात्मा गांधी चित्रपटात तरुणपणीच पण तितक्याच ताकदीनं साकारलेली कस्तुरबा यांची भूमिका अशा चतुरस्त्र अभिनेत्रीच्या अभिनय साधनेची योग्य दखल घेतलीय असं वाटते का, असा प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या, "पुरस्काराबद्दल समाधान वाटतं. मुळात मी मराठी चित्रपटसृष्टीत कमी काम केलं आहे. हिंदी आणि इतर भाषेमध्ये जास्त काम केलं आहे. टेलिव्हिजन, नाटक इतर ठिकाणी काम केलं आहे. त्याचवेळी राज्स शासनानं पुरस्कार देऊन कामाची दखल घेतल्यानं आनंद वाटत आहे."

पुरस्काराबद्दल राज्य सरकारचा आभारी आहे. मला कमी पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारच्या पुरस्कारानं खूप आनंद झाला. आता पुरस्कार मिळाल्यानंतर काय बोलावं हे सुचत नाही. - सुदेश भोसले

ETV Bharat
ज्येष्ठ गायक सुदेश भोसले (ETV Bharat)

मी आधी गायक - गायक आणि मिमिक्री कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुदेश भोसले यांनीही ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया दिली. तुम्ही गाण्यांमध्ये वैविध्य जपलं. नकला करताना गायन कला दुर्लक्षित राहिली. अशा पुरस्कारांमुळे त्याची भरपाई झाली असं वाटतं का? यावर सुदेश भोसले म्हणाले, " ज्येष्ठ गायिका आशा भोसले, किशोर कुमार हे गायक म्हणून मला नेहमी कार्यक्रमासाठी घेऊन जायचे. आशा भोसले हे सांगायच्या, सुदेश भोसले असला की दुसरा गायक लागत नाही. त्यांनी गायक म्हणून मला नेहमी मान दिला. लोकांनी कॉमेडियन म्हणून मान दिला. माझी आई, आजी या आग्रामधील संगीत घराण्यातील गायिका होत्या. माझी मिमिक्री जास्त प्रसिद्ध असल्यामुळे लोकांना माझी गाण्याची पार्श्वभूमी तेवढी माहीत नाही. गणपतीच्या कार्यक्रमातही 'चुम्मा चुम्मा' या गाण्याची मागणी होते. मी आधी गायक आहे, तर लोकांसाठी मिमिक्री आर्टिस्ट आहे. राज्य सरकारनं पुरस्कार दिल्यानंतर ४५ वर्षांची कामाची एकप्रकारे दखल घेतली. त्यामुळे खूप खूप आनंद वाटत आहे."

अनुराधा पौडवाल यांचं व्यक्तिमत्व महान- "अनुराधा पौडवाल यांचं संगीत क्षेत्रात मोठं नाव आहे. त्या एक महान व्यक्तिमत्व आहेत. त्यांची गाणी ऐकत मी लहानाची मोठी झाले. त्यांच्या गाण्यातून खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांना राज्य शासनाचा यावर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्यामुळे निश्चितच आम्हाला फार आनंद झाला आहे. अनुराधा पौडवाल या मोठ्या गायिका आहेत," अशी प्रतिक्रिया गायिका सावनी रविंद्र यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

हा दुग्धशर्करा योग-अनुराधा पौडवाल- ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी ईटीव्ही भारतला एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, " ज्यांना वर्षानुवर्षे पुजले, आदर्श आहेत, त्यांच्या नावानं पुरस्कार मिळणं, ही आनंदाची गोष्ट आहे. लता मंगेशकर यांच्या नावानं पुरस्कार मिळत असल्यानं खूप आनंद वाटत आहे. ते वेगळे तेज असते. हा पुरस्कार राज्य सरकारकडून मिळत आहे. त्यामुळे हा दुग्धशर्करा आहे." हा पुरस्कार उशिरा मिळत आहे का, असे विचारले असता त्यांनी "देर आये दुरुस्त आहे," असे म्हटलं. "प्रत्येक गोष्टीला वेळ असते," असे सांगत गायिका अनुराधा पौडवाल यांनी पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केलं.

Last Updated : Aug 13, 2024, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.