जयपूर UP Man Found Dead : उत्तरप्रदेशातून बेपत्ता असलेल्या तरुणाचा राजस्थानात गळा चिरलेल्या अवस्थेत कालव्यात मृतदेह आढळून आला. शिवकुमार असं कालव्यात मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला आहे. शिवकुमार हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह श्रीगंगानगर जिल्ह्यातील गजसिंगपूर इथल्या कालव्यात गुरुवारी आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी शिवकुमारचा मृतदेह शवागृहात ठेवला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
गळा चिरुन खून केल्याचा पोलिसांना संशय : श्रीगंगानगर जिल्ह्यातील गजसिंहपूर इथल्या कालव्यात मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. या मृतदेहाच्या गळ्यावर चिरल्याच्या खोल जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळं पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.
ओळख पटवण्यात करावी लागली कसरत : श्रीगंगानगर जिल्ह्यातील कालव्यात मृतदेह आढळून आल्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. याबाबत गजसिंहपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामप्रताप यांनी "गुरुवारी संध्याकाळी हा मृतदेह कालव्यात आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह कालव्यातून बाहेर काढला. मृतानं अंगात जॅकेट घातलं होतं. तर राखाडी रंगाचा पँट आणि खाकी रंगाचे शूज घातले होते. मृतदेहाची झडती घेतली असता, त्याच्या खिशात सहारनपूर इथल्या एका खासगी डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन आणि एक फोन आढळून आला होता. मोबाईलमध्ये सिमकार्डही बसवण्यात आलं होतं. त्या आधारानं मताची ओळख पटवण्यात आली," असं त्यांनी सांगितलं.
सहारनपूरमधून बेपत्ता होता शिवकुमार : पोलिसांच्या सायबर सेलनं सिमकार्डची तपासणी केल्यानंतर हे कार्ड शिवकुमार याचं असल्याचं स्पष्ट झालं. तो गोयला जिल्हा सहारनपूर इथला रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी शिवकुमार याच्याविषयी पडताळणी केली. यावेळी सहारनपूर जिल्ह्यातील शिवकुमार हा दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचं उघड झालं. शिवकुमार याच्या नातेवाईकांना पोलिसांनी माहिती दिली आहे. त्याचे नातेवाईक तत्काळ राजस्थानकडं रवाना झाले आहेत. नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा :