ETV Bharat / bharat

खासगी बस आणि कारची भीषण धडक; आग्रा लखनऊ महामार्गावर 6 ठार, 45 प्रवासी जखमी - Agra Lucknow Expressway Accident - AGRA LUCKNOW EXPRESSWAY ACCIDENT

Agra Lucknow Expressway Accident : आग्रा लखनऊ महामार्गावर इटावा इथं कार आणि प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 प्रवासी ठार झाले असून 45 प्रवासी जखमी झाले आहेत.

Agra Lucknow Expressway Accident
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 10:03 AM IST

लखनऊ Agra Lucknow Expressway Accident : कार आणि खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 6 प्रवासी ठार झाले असून बसमधील 45 प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना आग्रा लखनऊ महामार्गावर इटावा इथं शनिवारी पहाटे घडली. अपघाताची माहिती मिळताच इटावा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ बचावकार्य करत या अपघातातील 45 जखमी प्रवाशांना सैफई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

अपघातानंतर कार माहामार्गावरु पडली खाली : शनिवारी पहाटे आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवरुन इटावादरम्यान कारमधून काही प्रवासी जात होते. यावेळी त्यांच्या कारची आणि प्रवासी बसची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की अपघातानंतर कार आग्रा लखनऊ महामार्गाच्या खाली कोसळली. त्यामुळे कार एक्स्प्रेस वेवरुन खाली पडल्यानं कारचा चक्काचूर झाला. या अपघातात प्रवासी बसचंही मोठं नुकसान झालं. या अपघातात कारमधील 3 आणि बसमधील 3 अशा एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अपघातात कार आणि बसमधील एकूण 45 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती इटावा पोलीस सूत्रांनी दिली.

कार आणि बसच्या भीषण धडकेत 6 प्रवासी ठार : इटावा इथं आग्रा लखनऊ महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळावर जखमी नागरिकांनी केलेल्या आरडाओरडानं नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी जखमींना सैफई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवलं. इटावाचे पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितलं की, "हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. आतापर्यंत या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत."

हेही वाचा :

  1. कानपूरमध्ये अल्पवयीन मुलानं कारसोबत स्टंटबाजी करताना दोघींना उडवलं; थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद! - Kanpur News
  2. देवघरवरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला ; कारच्या भीषण अपघातात 5 कावडधाऱ्यांचा मृत्यू - Latehar Road Accident
  3. पत्रकार हर्षल भदाणे यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू, चालकाला अटक - Journalist Harshal Bhadane

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.