ETV Bharat / bharat

निर्माणाधीन धर्मशाळेचं छत कोसळलं; 4 मजुरांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू, 9 जण गंभीर - Dharamshala Roof Collapsed

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 8:20 AM IST

Dharamshala Roof Collapsed : निर्माणाधीन धर्मशाळेचं छत कोसळून 4 मजुरांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. ही घटना राजस्थानमधील राजमसंद जिल्ह्यातील बलाई बस्ती इथं सोमवारी रात्री घडली.

Dharamshala Roof Collapsed
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

जयपूर Dharamshala Roof Collapsed : निर्माणाधीन धर्मशाळेचं छत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला तर तब्बल 9 जण गंभीर जखमी झाले. ही घटना राजसमंद जिल्ह्यातील खमनोर जिल्ह्यातील बलाई बस्ती इथं सोमवारी रात्री घडली. बाहेर काढण्यात आलेल्या जखमी मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात भगवतीला शंकलराल साळवी ( वय 40 ) भंवरलाल लच्छा साळवी ( 50 ), शांतीलाल नारुलाल साळवी ( 35 ), कालूलाल वेणा साळवी ( 40 ) यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच राजसंदचे जिल्हाधिकारी डॉ. भंवरलाल आणि पोलीस अधीक्षक मनीष त्रिपाठी घटनास्थळी दाखल झाले. पाच तास चाललेल्या बचावकार्यानंतर 9 जखमी आणि 4 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गाव रात्रभर जागून राहिलं आहे.

साफसफाईसाठी मजूर गेले होते धर्मशाळेत : राजसमंद जिल्ह्यातील खमनोर परिसरात चिकलवासातील बलाई बस्ती इथं धर्मशाळेचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर अनेक मजूर कार्यरत आहेत. मंगळवारी हे मजूर साफसफाई करण्यासाठी निर्माणाधीन धर्मशाळेत गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर राजसमंदचे जिल्हाधिकारी डॉ. भंवरलाल म्हणाले की, "मेघवाल समाजाच्या वतीनं लोकसहभागातून चिकलवास गावात धर्मशाळा बांधण्यात येत आहे. सोमवारी छताखालील बांबूचे खांब काढण्यात आले. त्यानंतर सोमवारी रात्री नऊ वाजता मजूर बांधकाम सुरू असलेल्या धर्मशाळेची साफसफाई आणि रंगरंगोटी करण्यासाठी गेले होते. यावेळी रात्री 9.30 वाजता छत कोसळून खाली पडलं. त्याखाली साफसफाईचं काम करणारे 13 जण दबले गेले. या धर्मशाळेच्या आसपास घरं नव्हती. त्यानंतर छताखाली दबलेले वॉर्डाचे पंच हिरालाल यांनी मोबाईलवरून फोन करून अपघाताची माहिती गावात दिली. त्यानंतर गावातून मोठ्या संख्येनं ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. खमनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी भगवान सिंह, नाथद्वाराचे डीएसपी दिनेश सुखवाल घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकारी डॉ. भंवरलाल, पोलीस अधीक्षक मनीष त्रिपाठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र कुमार हेही रात्री 10.30 वाजता घटनास्थळी पोहोचले. यावेळी SDRF पथकासह नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांना पाचारण करून बचावकार्य करण्यात आलं."

जेसीबीने हटवला घटनास्थळावरचा ढिगारा : निर्माणाधीन धर्मशाळेचं छत कोसळल्यानं तब्बल 4 मजुरांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात घटनास्थळावर तब्बल 6 जेसीबी मागवण्यात आल्या. रात्री 11 वाजता बचावकार्य सुरु करण्यात आलं. छत कोसळल्यानंतर तत्काळ मदत मिळाल्यानं 3 मजुरांना लगेच बाहेर काढण्यात आलं. 6 झखमींना बाहेर काढल्यानंतर 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले. या जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात हिरालाल तुलसीराम साळवी ( 30 ), मांगीलाल शंकर साळवी ( 35 ), मिठूलाल मोहनलाल साळवी ( 30 ) लक्ष्मण मोहनलाल साळवी ( 35), लक्ष्मण भेरा साळवी ( 35 ) आणि गोपीलाल खीमा साळवी ( 65 ) अशी जखमी मजुरांची नावं आहेत.

हेही वाचा :

  1. School Roof Collapsed: होत्याचे झाले नव्हते; शाळेचे छत शिक्षकाच्या डोक्यावर कोसळले
  2. Gurugram Building Collapse : गुरुग्राममध्ये मोठी दुर्घटना, दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
  3. पावसामुळे घराचे छप्पर कोसळून 3 जण ठार तर 4 जखमी, मृतांमध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीचा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.