श्रीनगर : भारतीय सैन्य दलाच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री बारामुल्लाच्या बुटापाथरी परिसरात हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय सैन्य दलाच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. तर दोन हमाल या हल्ल्यात मृत झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे जवान जखमी झाले आहे. याबाबतची माहिती भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली आहे.
Very unfortunate news about the attack on the army vehicles in the Boota Pathri area of North Kashmir which has resulted in some casualties & injuries. This recent spate of attacks in Kashmir is a matter of serious concern. I condemn this attack is the strongest possible terms &…
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 24, 2024
भारतीय सैन्य दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला : गस्तीवर असलेल्या भारतीय सैन्य दल जवानांच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री बुटापाथरी परिसरात भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय सैन्य दलाच्या दोन जवानांना वीरमरण आलं. यावेळी वाहनात असलेल्या दोन हमालांनाही आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर सैन्य दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची शक्यता सैन्य दलाच्या जवानांनी वर्तवली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
#UPDATE | Two Indian Army soldiers and two civilian porters killed in the terrorist attack on a military vehicle in Baramulla. One soldier and one porter are injured and undergoing treatment: Indian Army officials https://t.co/EC6qVyR8SC
— ANI (@ANI) October 25, 2024
एक जवान आणि एक हमाल जखमी : दहशतवाद्यांनी बारामुल्लातील बुटापाथरी परिसरात भारतीय सुरक्षा दलाच्या वाहनांवर केलेल्या भीषण हल्ल्यात दोन जवानांना वीरमरण आलं. यावेळी दोन हमालांचा मृत्यू झाला. या घटनेत एक सुरक्षा दलाचा जवान आणि एक हमाल जखमी झाला आहे. या जखमींवर सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती भारतीय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ओमर अब्दुलांनी व्यक्त केला शोक : उत्तर काश्मीरमधील बुटा पाथरी इथं दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला केला. या प्रकरणी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शोक व्यक्त केला. सोशल माध्यमांवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यात त्यांनी "उत्तर काश्मीरमधील बुटा पाथरी परिसरात सुरक्षा दलाच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याची बातमी दुर्दैवी आहे. या हल्ल्यात काही जवानांना वीरमरण आलं आहे, तर काही जखमी झाले आहेत. हल्ल्याची ही मालिका चिंताजनक आहे. या हल्ल्याचा मी निषेध करतो. वीरमरण आलेल्या जवानांच्या नातेवाईकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. तर जखमी लवकर बरे व्हावेत म्हणून मी प्रार्थना करतो" असं नमूद केलं आहे.
हेही वाचा :