लखनऊ Barber Kills Two Children In Badaun : दोन चिमुकल्यांचा गळा चिरुन नराधमानं त्यांचा निर्घृण खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना बदाऊ इथल्या सिव्हिल लाईन्स परिसरातील मंडी समिती चौकी जवळ घडली. या घटनेत एक मुलगी जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या जमावानं मोठी जाळपोळ केली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरिय बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कुमार, पोलीस महासंचालक प्रशांत कुमार आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी नराधम साजिदला कंठस्नान घातलं.
दोन चिमुकल्यांचा गळा चिरुन खून : बदाऊ इथल्या मंडी समिती चौकीजवळ जावेद या नराधमानं दोन चिमुकल्यांचा गळा चिरुन खून केल्याची खळबळजनक घटना घडली. त्यामुळे जमावानं मोठी जाळपोळ करत पोलीस चौकीला घेराव घातला. जावेद याच्या हल्ल्यात एक मुलगी गंभीर जखमी झाल्याचं उघड झालं. त्यामुळे संतप्त जमावानं घोषणाबाजी करत जाळपोळीला सुरुवात केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली बैठक : दोन चिमुकल्यांचा निर्घृण खून झाल्यानं परिस्थिती चांगलीच चिघळली. संतप्त जमावानं जाळपोळ करत मोठा राडा केला. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरिय बैठक बोलावली. यावेळी त्यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कुमार, पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. जमावाला शांत करुन परिसरात शांतता प्रस्थापित करण्याचंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश आल्यानंतर पोलिसांनी जमावाला शांत करुन आरोपीचा शोध सुरू केला.
पोलिसांनी घातलं नराधमाला कंठस्नान : "पोलिसांनी नराधम साजिदचा शोध सुरू केला असता, तो तलवार घेऊन पळत होता. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी साजिदनं पोलिसांवरच हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला कंठस्नान घातलं," असं पोलीस महानिरीक्षक राकेश सिंह यांनी यावेळी सांगितलं.
शांतता राखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न : बदायू इथल्या दोन चिमुकल्याच्या खून प्रकरणातील आरोपी साजिदचा एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर परिस्थिती निवळत आहे. याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना जिल्हाधिकारी मनोज कुमार यांनी सांगितलं की, "बदायू पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शांतता राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आरोपी साजिद याचा एन्काऊंटर करण्यात पोलिसांना यश आलं आहे," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- Abhishek Ghosalkar Murder Case : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा; विनोद घोसाळकर यांची मागणी
- Indapur Crime News: जेवायला हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या, गँगवॉरची शक्यता
- Wife and daughter killed : धक्कादायक! भांडण गेलं विकोपाला, पुण्यात पतीकडून पत्नी आणि मुलीचा खून