अररिया (बिहार) Ram Mandir Bomb Threat : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यापूर्वी बिहारच्या अररिया येथील एका तरुणानं मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी दिली. या तरुणानं पोलिसांच्या 112 या क्रमांकावर अनेकवेळा फोन करून धमकी दिली. मोहम्मद इंतखाब असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे.
दाऊद टोळीचा छोटा शकील असल्याचा दावा : या तरुणानं स्वत:ला दाऊद इब्राहिम टोळीचा छोटा शकील असल्याचं म्हटलं आहे. त्यानं शुक्रवारी (19 जानेवारी) सायंकाळी 112 क्रमांकाला फोन लावून धमकी दिली. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देऊ, असं तो म्हणाला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ तपास सुरू केला. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तातडीनं कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून मोबाईल जप्त : पोलिसांनी धमकी देणाऱ्या तरुणाचे कॉल डिटेल्स काढले. यावरून ही व्यक्ती पलासीच्या कालियागंज बलुआ येथील असल्याचं आढळून आलं. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तेथे छापा टाकला आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीस अटक केली. पोलिसांनी या तरुणाचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलवरून कॉल करून त्यानं राम मंदिर उडवण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पलासी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धमकी देणाऱ्या तरुणाला अटक : "प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं कारवाई करण्यात आली. धमकी देणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याबाबत गांभीर्यानं तपास सुरू आहे", असं अररियाचे एसपी अशोक कुमार सिंह यांनी सांगितलं.
हे वाचलंत का :