Rajouri Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचं सत्र सुरू आहे. आठवडाभरापूर्वी जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे दशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील खवास येथे सैन्यदलाच्या कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सैन्यदलाचा एक जवान जखमी झाला.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "पहाटे साडेतीनच्या सुमारास दहशतवाद्यांनी विले-गुंडा येथे अलीकडेच नव्यानं स्थापन केलेल्या सैन्यदलाच्या कॅम्पवर हशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सैन्यदलानेही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एक जवान जखमी झाला. त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले." "हल्ल्यानंतर दहशतवादी लपून बसले. सैन्यदलानं घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. राजौरीतील एका दुर्गम गावात झालेला दहशतवादी हल्ला भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे." असं जम्मू डिफेन्सचे पीआरओ यांनी म्हटले.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात
हेही वाचा