ETV Bharat / bharat

लँड फॉर जॉब प्रकरण : लालू प्रसाद यादव यांच्यानंतर आज तेजस्वी यादवांची ईडी चौकशी - लँड फॉर जॉब

Tejashwi Yadav ED Inquiry : बिहारमध्ये गाजलेल्या लँड फॉर जॉब घोटाळ्यात ईडीनं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची सोमवारी 10 तास चौकशी केली आहे. त्यानंतर आज माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी होणार आहे.

Tejashwi Yadav ED Inquiry
माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 1:07 PM IST

पाटणा Tejashwi Yadav ED Inquiry : बिहारमध्ये लँड फॉर जॉब स्कॅम प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनालयानं ( ED ) तब्बल 10 तास चौकशी केली आहे. त्यानंतर आज बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा नंबर लागला आहे. ईडी आज तेजस्वी यादव यांची चौकशी करणार आहे. ईडीनं आज तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

ईडीनं पाठवलं होतं समन्स : लँड फॉर जॉब प्रकरणात ईडीनं लालू प्रसाद यादव यांच्यावर ठपका ठेवला आहे. त्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांची ईडीनं सोमवारी 10 तास चौकशी केली आहे. त्यानंतर आज ईडीनं माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना समन्स बजावलं आहे. आज तेजस्वी यादव यांची चौकशी करण्यात येणार आहे.

ईडीचा लालू प्रसाद यादव यांना दणका : ईडीनं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची लँड फॉर जॉब प्रकरणात सोमवारी तब्बल 10 तास चौकशी केली. सोमवारी लालू प्रसाद यादव यांना पाटणा इथल्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांची चौकशी करण्यात आली. यावेळी लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती या देखील त्यांच्या सोबत होत्या. आता ईडी मीसा भारती यांची 5 फेब्रुवारीला चौकशी करणार आहे. तर आज बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी होणार आहे. त्यामुळं ईडीनं लँड फॉर जॉब प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना चांगलाच दणका दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

ईडी कार्यालयाबाहेर सीआरपीएफ : ईडीनं लालू प्रसाद यादव यांची चौकशी केल्यानं बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली. त्यामुळं त्यांच्या समर्थकांनी ईडी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली. समर्थकांनी लालू प्रसाद यादव यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळं ईडी कार्यालयाबाहेर मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली. ईडीच्या कार्यालयाबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. लालू प्रसाद यादव यांची चौकशी रात्री नऊ वाजताच्या सुमारास संपली. आज तेजस्वी यादव यांची चौकशी होणार असल्यानं त्यांचे समर्थक गर्दी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

  1. लालू पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून समन्स; 'या' घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं
  2. मराठमोळ्या विनोद तावडेंची बिहारमध्ये चर्चा; सत्ता परिवर्तनात महत्त्वाची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.