ETV Bharat / bharat

आज सुटणार अमेठी, रायबरेलीचा तिढा; काँग्रेस जाहीर करणार उमेदवारी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना मिळणार संधी ? - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदार संघातील उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी माहिती दिली.

Lok Sabha Election 2024
संपादित छायाचित्र
author img

By ANI

Published : May 2, 2024, 10:12 AM IST

Updated : May 2, 2024, 11:02 AM IST

नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे दोन महत्वाचे टप्पे आतापर्यंत पार पडले आहेत. मात्र अद्यापही काँग्रेसनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदार संघातून लढण्याबाबत अद्यापही काँग्रेसकडून अधिकृत माहिती पुढं आली नाही. याबाबत विरोधकांकडून टीका होत असताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी महत्वाची माहिती दिली आहे. "काँग्रेस पक्ष निवडणुकीला घाबरत नसून गुरुवारी अमेठी आणि रायबरेली मतदार संघाचे उमेदवार जाहीर करण्यात येतील," असं त्यांनी स्पष्ट केलं. "पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं (CEC) काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अमेठी आणि रायबरेलीसाठी उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार दिले आहेत," असंही जयराम रमेश यांनी यावेळी सांगितलं.

राहुल गांधी अमेठीतून मैदानात उतरण्याची शक्यता : काँग्रेसनेते राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या मतदार संघातून लोकसभा निवडणूक 2024 लढवत आहेत. मात्र त्यासह ते अमेठी लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरण्याची शक्यता असल्याचं काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे. अमेठी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्या तथा मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का देत विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपानं स्मृती इराणी यांना मैदानात उतरवलं आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनेते राहुल गांधी निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'इंडिया' आघाडीतील त्यांच्या मित्र पक्षांनी राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढवावी असं सूचवलं आहे.

प्रियंका गांधी वाड्रा लढवणार रायबरेली : अमेठीनंतर रायबरेली हा काँग्रेस पक्षाचा सुरक्षित असलेला मतदार संघ मानला जातो. मात्र अमेठीसारखाचं रायबरेली या लोकसभा मतदार संघात अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी वाड्रा या रायबरेली लोकसभा मतदार संघातून निवढणूक लढवणार नाहीत, अशा चर्चा करण्यात येत होत्या. मात्र जयराम रमेश यांनी अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदार संघाबाबत गुरुवारी निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अमेठीतून राहुल गांधी तर रायबरेली मतदार संघातून प्रियंका गांधी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. समाजवादी पक्षानं या अगोदर रायबरेली मतदार संघावर दावा सांगितला होता. मात्र काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अखिलेश यादव यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे अखिलेश यादव यांनी कन्नौजमधून निवढणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्रियंका गांधी यांना रायबरेली मतदार संघातून उमेदवारी मिळाल्यास काँग्रेस पक्षाला त्यांच्या उमेदवारीचा फायदा मिळू शकतो, असंही सूत्रांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. "पंतप्रधान मोदी अब्जाधीशांसाठी काम करतात, तर पटनायक...", राहुल गांधींचा हल्लाबोल - Rahul Gandhi
  2. नरेंद्र मोदी, राहुल गांधींनी केलं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन? निवडणूक आयोगाची भाजपासह काँग्रेसला नोटीस - Lok Sabha Election 2024
  3. अमरावतीसह सोलापुरात राहुल गांधींची तोफ धडाडणार; दोन्ही ठिकाणी तापणार राजकीय वातावरण - Rahul Gandhi Rally

Last Updated : May 2, 2024, 11:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.